मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar 2023: भारताला दोन ऑस्कर मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्वीट

Oscar 2023: भारताला दोन ऑस्कर मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्वीट

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 13, 2023, 10:40 AM IST

    • Oscar 2023: ऑस्कर २०२३ या पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू या गाण्याला आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला ऑस्कर मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Oscar 2023 (HT)

Oscar 2023: ऑस्कर २०२३ या पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू या गाण्याला आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला ऑस्कर मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    • Oscar 2023: ऑस्कर २०२३ या पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू या गाण्याला आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला ऑस्कर मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

नरेंद्र मोदी यांनी नाटू नाटू गाण्याविषयी बोलताना म्हटले की, 'जगभरात नाटू नाटू हे गाणे लोकप्रिय आहे. पुढील काही वर्षे हे गाणे सर्वांच्या स्मरणात राहील. एमएम कीरवानी आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुमच्या या यशाने भारताला गौरव मिळवून दिला आहे.'
वाचा: ‘या’ चित्रपटाने जिंकला ऑस्कर २०२३ पुरस्कार, वाचा विजेत्यांची यादी

पुढे त्यांनी 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले की, 'तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल द एलिफंट व्हिस्पर्सच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुमचे काम हे नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेते.'

यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा हा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अभिनेत्री मिशेल योहने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होण्याचा मान स्विकारला तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार ब्रेंडन फ्रेझरला मिळाला. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.

विभाग