मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Piccolo: संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट! 'पिकोला'चा ट्रेलर प्रदर्शित

Piccolo: संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट! 'पिकोला'चा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 14, 2023, 02:55 PM IST

    • Piccolo Trailer: ‘पिकोलो’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
पिकालो (HT)

Piccolo Trailer: ‘पिकोलो’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    • Piccolo Trailer: ‘पिकोलो’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आज वेगवेगळ्या धाटणीचे अनेक मराठी चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांनाही असे चित्रपट पाहायला आवडतात. अशातच 'पिकोला' या नव्या मराठी चित्रपटाची घोषणी झाली आणि प्रेक्षकांमध्ये नावावरुन उत्सुकता पाहायला मिळाली. या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report

साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?

‘पिकोलो’ चित्रपट हा संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.

प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत ‘पिकोलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे.

‘पिकोलो’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकताच प्रकाशित करण्यात आला. राजसाहेबांनी चित्रपटाला मनापासून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग तसेच मध्यवर्ती भूमिकेतले कलाकार प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार उपस्थित होते.

विभाग