मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Paresh Mokashi: कौतुकास्पद! ‘आत्मपँफ्लेट’ची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Paresh Mokashi: कौतुकास्पद! ‘आत्मपँफ्लेट’ची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 20, 2023, 01:48 PM IST

    • Internationale Film fests piele Berlin: ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन १४ प्लस' स्पर्धा प्रकारात या चित्रपटाची निवड झाली आहे
आत्मपँफ्लेट (HT)

Internationale Film fests piele Berlin: ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन १४ प्लस' स्पर्धा प्रकारात या चित्रपटाची निवड झाली आहे

    • Internationale Film fests piele Berlin: ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन १४ प्लस' स्पर्धा प्रकारात या चित्रपटाची निवड झाली आहे

आनंद एल. राय आणि भूषण कुमार यांचा पहिला मराठी चित्रपट म्हणजे आत्मपँफ्लेट.’ या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी यांनी केले असून नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन १४ प्लस' स्पर्धा प्रकारात या चित्रपटाची निवड झाली आहे. भारतीयांसाठी ही कौतुकास्पद बातमी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

‘आत्मपँफ्लेट’ हा चित्रपट एका तरुण मुलाभोवती फिरणारा आहे, जो त्याच्या वर्गमित्राच्या प्रेमात पडतो. ही एकतर्फी प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी आहे, जी त्याच्या भोवतालच्या नाट्यमय सामाजिक-राजकीय बदलांच्या पलीकडे जाणारी आहे. ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता या चित्रपटाची ७३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.
वाचा: हिट ठरत असलेल्या 'वाळवी'चा नवा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांना मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरे

हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९) आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'वाळवी' (२०२३) यांसारख्या चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या परेश मोकाशी यांनी ‘आत्मपँफ्लेट’चे लेखन केले आहे. तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला असून ‘वाळवी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

या अविश्वसनीय कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना निर्माते आनंद एल राय म्हणाले, "प्रादेशिक जागतिक स्तरावर जाणं आणि विशेषत: प्रतिष्ठेच्या बर्लिन चित्रपट महोत्सवात स्थान मिळवणं, हे खूप चांगलं आहे. ‘आत्मपँफ्लेट’चा भाग होणं, हा एक जबरदस्त अनुभव आहे. कलर यलो प्रॉडक्शनसाठी हा खास चित्रपट आहे.''

विभाग