मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vaalvi: हिट ठरत असलेल्या 'वाळवी'चा नवा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांना मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरे

Vaalvi: हिट ठरत असलेल्या 'वाळवी'चा नवा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांना मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरे

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 20, 2023 01:00 PM IST

Vaalvi New Trailer: वाळवी हा चित्रपट १३ जानेवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने सर्वांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.

वाळवी
वाळवी (HT)

'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' चित्रपटात पाहायला मिळत आहे. हा चित्रपट सध्या तिकीट बारीवर चांगली कमाई करताना दिसत आहे. अशातच आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

वाळवी या चित्रपटाचा नवा ट्रेलर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते एकमेकांच्या डोक्यावर बंदक धरुन उभे असल्याचे दाखविले होते. हा सगळा स्वप्नील आणि शिवानी सर्वेचा कट असल्याचे दिसत होते. मात्र आता प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशीला गोळी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदरीत हा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता पाहायला मिळते.
वाचा: 'हे मराठी बिग बॉस आहे का?', पुन्हा एकदा शिव आणि अर्चनामध्ये वाजलं

वाळवी या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत आहे. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे. हा चित्रपट १३ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता आणखी एक ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग