मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss: 'हे मराठी बिग बॉस आहे का?', पुन्हा एकदा शिव आणि अर्चनामध्ये वाजलं

Bigg Boss: 'हे मराठी बिग बॉस आहे का?', पुन्हा एकदा शिव आणि अर्चनामध्ये वाजलं

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2023 09:31 AM IST

Bigg Boss 16: बिग बॉस १६च्या घरात शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये पुन्हा वाद झाल्याचे समोर आले आहे.

बिग बॉस
बिग बॉस (HT)

सध्या बिग बॉसचे १६वे पर्व चर्चेत आहे. लवकरच घरातील विजेता घोषित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी विजेत्याच्या बक्षीस रकमेतील 10 लाख ही एकमेव कमाई म्हणून घोषित केल्यानंतर बिग बॉसच्या संपूर्ण घराला मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे राशन खरेदी करताना स्पर्धकांना विचार करावा लागत आहे. या सगळ्यात राशन खरेदी करताना सर्व वस्तूंच्या किंमती जास्त असल्यामुळे शिव ठाकरेने खरेदी करताना सर्वांचा सल्ला घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

बिग बॉस १६च्या घरात स्पर्धकांना टास्क देण्यात आला होता. यामध्ये सर्व स्पर्धकांना ट्रॉली देण्यात आली आणि बजर वाजताच त्यांच्यामध्ये शर्यत सुरु झाली. जो स्पर्धक अंतिम रेषेपर्यंत पोहोचेल तो राशन आणण्यासाठी जाणार असे ठरवण्यात आले. या कार्याची निमृत संचालक होती.
वाचा: शिल्पी खरंच बदलणार की हे सगळं नाटक आहे? मालिका नव्या वळणावर

शालिन पाठोपाठ शिव राशन आणण्यासाठी जाणार होता. त्यापूर्वी शिव निमृत आणि इतर स्पर्धकांचा सल्ला घेतो. तो कॉफी खरेदी करतो. ते पाहून अर्चना शिवला 'हे मराठी बिग बॉस आहे का?' असे मजेशीर अंदाजात बोलते. त्यानंतर शिवने अर्चनाला स्वतःच्या औषधाची चव दिली आणि फक्त इतरांना शिव्याशाप दिल्याबद्दल आणि कार्य योग्यरित्या न केल्याबद्दल तिला फटकारले. यावर शालिन आणि निमृत यांनीही शिवची बाजू घेतली.

IPL_Entry_Point

विभाग