मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सई ताम्हणकर ते अंकुश चौधरी; या कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची NCPची मागणी, काय आहे प्रकरण?

सई ताम्हणकर ते अंकुश चौधरी; या कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची NCPची मागणी, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 28, 2023, 08:27 AM IST

    • Sai Tamhankar: राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पत्र लिहित ही मागणी केली आहे.
सई ताम्हणकर (HT)

Sai Tamhankar: राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पत्र लिहित ही मागणी केली आहे.

    • Sai Tamhankar: राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पत्र लिहित ही मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून काही मराठी आणि हिंदी कलाकरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. ही मागणी का करण्यात आली आहे? काय आहे प्रकरण? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या मागचे कारण आहे ऑनलाइम रमी खेळण्याची जाहिरात.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

अनेक हिंदी आणि मराठी कलाकार हे ऑनलाइन रमी खेळा आणि पैसे कमवा अशी जाहिरात करताना दिसतात. ते खेळाचे प्रमोशन करताना दिसतात. मात्र ऑनलाईन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या जाहिरांतीतील मराठी आणि हिंदी कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्रात जुगार आणि मटका खेळण्यास सक्त मनाई आहे. असे करताना दिसणाऱ्यावर कारवाई केली जाते. सध्या रमी खेळ ऑनलाइन खेळला जातोय आणि या पत्त्यांचा खेळ आहे. अनेक कलाकार याची जाहिरात करून लोकांना रमी खेळण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाचा: ‘पठाण’ प्रदर्शित होताच कंगनाने व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाली...

काही कलाकार हे दारु, गुटखा आणि इतर आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या गोष्टींच्या जाहिराती करण्यास नकार देतात. त्यांचे नेहमी कौतुक होते. मात्र फक्त पैसे कमावण्याच्या उद्दीष्टाने समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या जाहिरातीत काम करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करून शिक्षा करणे महत्त्वाचे असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने रमी खेळण्याच्या जाहिरातीमध्ये काम करणाऱ्या मराठी आणि हिंदी कलाकारांची यादी काढली आहे. या यादीमध्ये सई ताम्हणकर, श्रृती मराठे, अंकुश चौधरी, अमेय वाघ, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, उमेश कामत, गौरी नलावडे आणि अमृता खानविलकर या कलाकारांचा समावेश आहे.

विभाग