मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘पठाण’ प्रदर्शित होताच कंगनाने व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाली...
कंगना रणौत
कंगना रणौत (HT)

Pathaan: ‘पठाण’ प्रदर्शित होताच कंगनाने व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाली...

25 January 2023, 16:37 ISTAarti Vilas Borade

Kangana Ranaut: आता कंगनाने शाहरुखचा पठाण प्रदर्शित होताच केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार हवा सुरू आहे. शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सगळे चाहते देखील आतुर झाले होते. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आज संपली आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुचे कौतुक करत आहेत. अशातच अभिनेत्री कंगना रणौतने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कंगना रणौत ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत समाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. नुकताच तिचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात आले आहे. आता कंगनाने शाहरुखचा पठाण प्रदर्शित होताच संताप व्यक्त केला आहे.
वाचा: कंगना रणौतची ट्विटरवर वापसी, पाहा काय आहे पहिले ट्वीट

काय म्हणाली कंगना?

“चित्रपटसृष्टी इतकी मुर्ख आहे की, कोणताही केलेला प्रयत्न, निर्मिती किंवा कला ही किती यशस्वी ठरली हे सांगण्यासाठी फक्त किती पैसे कमावले हे दाखवले जाते. कलेचा दुसरा काहीच हेतू नाही असं भासवलं जातं. चित्रपटसृष्टीचा दर्जा किती घसरला आहे? हे यामधून दिसून येतं.” या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

सध्या सगळीकडे ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करणार आहे. चित्रपटाच्या कथानकासह या चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

विभाग