मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Serials: 'या' मालिकांमध्ये पाहायला मिळणार वटपौर्णिमा विशेष आठवडा

Marathi Serials: 'या' मालिकांमध्ये पाहायला मिळणार वटपौर्णिमा विशेष आठवडा

Aarti Vilas Borade HT Marathi

May 29, 2023, 07:26 PM IST

    • Vat Purnima: लग्न झालेल्या स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचं हे व्रत करतात. या निमित्ताने झी मराठीवरील मालिकांमध्ये ‘वटपौर्णिमा विशेष’ भाग दाखवले जाणार आहे.
Marathi Serials

Vat Purnima: लग्न झालेल्या स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचं हे व्रत करतात. या निमित्ताने झी मराठीवरील मालिकांमध्ये ‘वटपौर्णिमा विशेष’ भाग दाखवले जाणार आहे.

    • Vat Purnima: लग्न झालेल्या स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचं हे व्रत करतात. या निमित्ताने झी मराठीवरील मालिकांमध्ये ‘वटपौर्णिमा विशेष’ भाग दाखवले जाणार आहे.

झी मराठी मालिकांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे आणि प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मालिकांमध्ये पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. झी मराठी नेहमी आपल्या मालिकेच्या कथांमध्ये नवीन मनोरंजक वळण देऊन प्रेक्षकांचे मन जिंकत असतात. जून महिना म्हटलं की येते वटपौर्णिमा. लग्न झालेल्या स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचं हे व्रत करतात. या निमित्ताने झी मराठीवरील मालिकांमध्ये ‘वटपौर्णिमा विशेष’ भाग दाखवले जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

या भागांमध्ये खासकरून 'अप्पी आमची कलेक्टर', 'नवा गडी नवा राज्य', 'लवंगी मिरची' आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये आपण पाहणार आहोत की वटपोर्णिमेच्या दिवशी कलेक्टर अपर्णा सुरेश माने आपले कर्तव्य व्रत पूर्ण करत अर्जुनला भ्रष्टचाराच्या आरोपाखाली अटक करणार आहे. दुसरीकडे 'नवा गडी नव राज्य' मध्ये राघव वर येणार आहे एक नवीन संकट, आनंदीचे वटपोर्णिमेचे व्रत वाचवू शकेल का राघवला या संकटातून?

‘लवंगी मिरची’ मध्ये राधाक्काला वट पोर्णिमेचे व्रत ठेवता येईल का? की यामिनी यातही काही अडचणी आणेल? तर वटपौर्णिमा विशेष आठवड्यात 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' अद्वैतच्या दीर्घायुष्यासाठी नेत्रा घेणार आहे एक महत्वपूर्ण निर्णय. त्यामुळे ‘वटपौर्णिमा विशेष’ आठवडा सोमवार ते शनिवार, 'अप्पी आमची कलेक्टर' संध्या ७ वाजता, 'नवा गडी नव राज्य' रात्री ९ वा., लवंगी मिरची रात्री १० वा. आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' रात्री १०.३० वाजता झी मराठीवर प्रदर्शित होणार आहे.

विभाग