मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने ५३व्या मजल्यावर खरेदी केले नवे घर, जाणून घ्या किंमत

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने ५३व्या मजल्यावर खरेदी केले नवे घर, जाणून घ्या किंमत

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 05, 2022, 11:58 AM IST

    • Madhuri Dixit New House: मुंबईतील लोअर परेल भागातील एका बिल्डिंगमध्ये माधुरीने हे घर खेरदी केले आहे.
माधुरी दीक्षित (HT)

Madhuri Dixit New House: मुंबईतील लोअर परेल भागातील एका बिल्डिंगमध्ये माधुरीने हे घर खेरदी केले आहे.

    • Madhuri Dixit New House: मुंबईतील लोअर परेल भागातील एका बिल्डिंगमध्ये माधुरीने हे घर खेरदी केले आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षित ओळखली जाते. एकेकाळी तिने डान्स आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. काही दिवसांपूर्वीच तिची 'फेम गेम' ही सीरिज प्रदर्शित झाली. त्यावेळी ती चर्चेत होती. त्या पाठोपाठ आता माधुरीने मुंबईत नवे घर खरेदी केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...

लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

Actor Sahil Khan arrested: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, माधुरी दीक्षितने मुंबईतील लोअर परेल परिसरातील एका बिल्डींगमध्ये हा घर खरेदी केले आहे. तिचे हे घर ५३व्या मजल्यावर असून घराची किंमत जवळपास ४८ कोटी रुपये आहे. २८ सप्टेंबर २०२२ रोजी या घराची रजिस्ट्री करण्यात आली आहे. माधुरीचे हे घर ५३८४ क्वेअर फूटमध्ये आहे. या अपार्टमेंटसोबत माधुरीला ७ कार पार्किंगसाठी स्लॉट देण्यात आले आहेत.
वाचा : 'काश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकानं मुंबईत घेतलं आलिशान घर, किंमत वाचून चक्रावून जाल!

यापूर्वी माधुरीने मुंबईतील पॉश एरिया वरळी येथील बिल्डिंगमध्ये २९व्या मजल्यावर आलिशान फ्लॅट भाडेतत्त्वार घेतला आहे. तिच्या या नव्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. हे घर आर्किटेक्ट अपूर्वा मेहताने ४५ दिवसांमध्ये तयार केले होते. घराचे इंटेरीअर माधुरी आणि तिचा पती श्रीराम नेने यांच्या आवडीनुसार करण्यात आले. दर महिना १२.५ लाख रुपये भाडे माधुरी देत आहे. तिचे हे आलिशान घर ५५०० स्क्वेअर फीटमध्ये आहे.

माधुरीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिची 'द फेम गेम' ही सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये तिने अनामिका नावाच्या अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, गगन अरोरा हे कलाकार दिसले होते. त्यानंतर आता तिचा 'मजा मा' हा चित्रपट येणार आहे.

विभाग