मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vivek Agnihotri: 'काश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकानं मुंबईत घेतलं आलिशान घर, किंमत वाचून चक्रावून जाल!

Vivek Agnihotri: 'काश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकानं मुंबईत घेतलं आलिशान घर, किंमत वाचून चक्रावून जाल!

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 04, 2022 05:04 PM IST

The Kashmir Files Director Vivek Agnihotri: विवेकने १.७ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीसाठी भरले आहेत.

विवेक अग्निहोत्री
विवेक अग्निहोत्री (HT)

'द कश्मिर फाइल्स' या चित्रपटाने घराघरात पोहोचलेले दिग्दर्शक म्हणजे विवेक अग्निहोत्री. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता विवेक आणि त्याची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशीने मुंबईत नवे घर खरेदी केले आहे. विवेकने हे घर वर्सोवा येथे खरेदी केले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, विवेकने ही प्रॉपर्टी Ecstasy Realty डेवलपरद्वारे खरेदी केली आहे. त्यांनी बिल्डिंगमधील ३०व्या मजल्यावर हे घर खरेदी केले आहे. ३२५८ क्वेअर फूटाचे हे घर आहे. त्यासोबतच त्यांनी तीन कार पार्किंगची जागा देखील देण्यात आली आहे. विवेक आणि पल्लवीने या घरासाठी १.७ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीसाठी भरले असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने वरळीत खरेदी केले नवे घर, किंमत वाचून व्हाल थक्क

विवेक आणि पल्लवीच्या घराची किंमत ही ५५ हजार रुपये पर क्वेअर फीट आहे. त्यांनी हे घर १७ कोटी ९२ लाख रुपयांना खरेदी केले आहे. विवेक आणि पल्लवीने अद्याप घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. पण चाहत्यांमध्ये घर पाहण्याची उत्सुकता आहे.

काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्रीचा बीफ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ढाला होता. त्या व्हिडीओमध्ये तो 'मला बीफ आवडतं' असे बोलताना दिसला होता. या व्हिडीओमुळे विवेकला ट्रोल केले जात होते. त्यानंतर त्याने त्यावर स्पष्टीकरण दिले.

IPL_Entry_Point

विभाग