मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC: २ लाइफलाइन असूनही २५ लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?

KBC: २ लाइफलाइन असूनही २५ लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 01, 2023, 09:52 AM IST

    •  Kon Honar Marathi Crorepati: या २५ लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे तुम्हाला योग्य उत्तर माहिती आहे का?
कोण होणार करोडपती

Kon Honar Marathi Crorepati: या २५ लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे तुम्हाला योग्य उत्तर माहिती आहे का?

    •  Kon Honar Marathi Crorepati: या २५ लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे तुम्हाला योग्य उत्तर माहिती आहे का?

सध्या छोट्या पडद्यावरील महितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा शो 'कोण होणार करोडपती' चर्चेत आहे. शो नुकताच सुरु झाला आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाला २५ लाख रुपयांच्या प्रश्नाला खेळ सोडावा लागला आहे. या प्रश्नाचे तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता का?

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

सोमवारी २९ मेपासून सुरू झालेल्या 'कोण होणार करोडपती' या शोमध्ये पहिला स्पर्धक मोहित सोनवणे हॉट सीटवर बसला होता. मोहितने १२व्या प्रश्नापर्यंत कोणतीही लाईफलाईन वापरली नाही. मात्र २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्याने दोन लाइफलाइन वापरल्या. तरीही उत्तराची खात्री नसल्यामुळे त्याने खेळ सोडला आहे. पण या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही देऊ शकता का?

काय होता २५ लाख रुपयांसाठी प्रश्न?

सिंगापूर येथे निधन झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कोण होते? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी A. वसंतदादा पाटील, B. वसंतराव नाईक, C. यशवंतराव चव्हाण व D. सुधाकरराव नाईक हे पर्याय देण्यात आले होते. मोहितने या प्रश्नाच्या उत्तरासाठी बराच वेळ घेतला. दोन लाइफलाइन घेतल्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर B. वसंतराव नाईक हे आहे. पण प्रश्न बदलण्याची लाइफलाइन वापरल्यामुळे मोहितचा हा प्रश्न बदलण्यात आला.

त्यानंतप २५ लाख रुपयांसाठी १९५२ मध्ये व्ही. शांताराम यांच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड आणि म्युझिकसाठी कान ग्रो प्री पुरस्कार मिळाला? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी A. दो आंखे बारह हाथ, B. झनक झनक पायल बाजे, C. अमर भूपाळी, D. नवरंग असे पर्याय देण्यात आले होते. मोहितने या प्रश्नाला आणखी दोन लाइफलाइन वापरल्या. मात्र, उत्तरावर ठाम नसल्याने त्याने खेळ सोडला. त्यानंतर जाता जाता त्याने C. अमर भूपाळी हे उत्तर दिले. हा योग्य पर्याय आहे असे देखील ते म्हणाले.

विभाग