मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Baipan Bhari Deva: सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा, केदार शिंदेचा नवा चित्रपट

Baipan Bhari Deva: सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा, केदार शिंदेचा नवा चित्रपट

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 18, 2022, 02:32 PM IST

    • Kedar Shinde: केदार शिंदे दिग्दर्शित "बाईपण भारी देवा" हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
बाईपण भारी देवा (HT)

Kedar Shinde: केदार शिंदे दिग्दर्शित "बाईपण भारी देवा" हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

    • Kedar Shinde: केदार शिंदे दिग्दर्शित "बाईपण भारी देवा" हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

'घे डबल' आणि 'गोदावरी' या दोन मराठी चित्रपटांच्या घोषणेनंतर, जिओ स्टुडिओजने त्यांच्या सलग तिसऱ्या चित्रपटची, 'बाईपण भारी देवा' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खुमासदार शैलीने नटलेला हा चित्रपट येत्या नव वर्षात, ६ जानेवारी २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एमव्हीबी मीडियाच्या माधुरी भोसले यांनी केली असून बेला शिंदे आणि अजित भुरे याचे सह-निर्माते आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report

"बाईपण भारी देवा" या चित्रपटाचं महत्वाचं आकर्षण म्हणजे या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर अश्या सहा उत्तम कलाकारांची धमाल आपल्याला बघायला मिळणार आहे. काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त झालेल्या आणि त्याचबरोबर कौटुंबिक, वैयक्तिक तसंच आर्थिक समस्या अश्या गोष्टींचा सामना करणाऱ्या सहा बहिणींची ही कथा आहे.

चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल बोलताना, दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “आपल्या सर्वांच्या दररोजच्या आयुष्यात अशा स्त्रिया आहेत ज्या अशा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, परंतु आपणच कळत नकळतपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. ‘बाईपण भारी देवा' हा चित्रपट अशाच महिलांना समर्पित आहे. या सहा बहिणींची ही गोष्ट सर्वांना नक्कीच आवडेल. आणि नवीन वर्षाची सुरुवात एका आशादायी आणि आनंदाने होईल याची मला खात्री आहे.” जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' येत्या नव वर्षात ६ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

विभाग