मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Phone Bhoot Twitter Review: ‘पैसा वसूल चित्रपट!’, ‘फोन भूत’ पाहिल्यानंतर नेटकरी आणखी काय म्हणाले?

Phone Bhoot Twitter Review: ‘पैसा वसूल चित्रपट!’, ‘फोन भूत’ पाहिल्यानंतर नेटकरी आणखी काय म्हणाले?

Nov 04, 2022, 05:46 PM IST

  • Phone Bhoot Twitter Review: ‘फोन भूत’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. यात कतरिना पहिल्यांदाच एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

Phone Bhoot

Phone Bhoot Twitter Review: ‘फोन भूत’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. यात कतरिना पहिल्यांदाच एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

  • Phone Bhoot Twitter Review: ‘फोन भूत’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. यात कतरिना पहिल्यांदाच एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

Phone Bhoot Twitter Review: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif), अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar) अभिनित ‘फोन भूत’ हा चित्रपट आज (४ नोव्हेंबर) चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. विकी कौशलशी लग्नगाठ बांधल्यानंतर हा कतरिनाचा पहिलाच चित्रपट असणार आहे. ‘फोन भूत’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट असून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकदेखील सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देत आहेत. चला तर जाणून घेऊया नेटकऱ्यांना कसा वाटलाय हा चित्रपट...

ट्रेंडिंग न्यूज

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report

साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?

'फोन भूत'चा ट्रेलर पाहता, या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमध्ये हॉरर कॉमेडीची छटा तसेच कतरिना कैफचा स्टायलिश लूक दाखवण्यात आला होता, जो पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक होते. अखेर आज हा चित्रपट रिलीज झाला आहे. यात कतरिना पहिल्यांदाच एका हटके भूमिकेत दिसणार आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिल्यानंतर चाहते आणि प्रेक्षक सोशल मीडियावर त्यांना हा चित्रपट कसा वाटला, हे सांगत आहेत.

ट्विटरवरील प्रतिक्रिया पाहता चाहत्यांना या चित्रपटातील कतरिनाचा लूक आवडला आहे. याशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या कॉमिक टायमिंगचेही प्रेक्षक कौतुक करत आहेत. कतरिनाचा हा चित्रपट ‘बेस्ट हॅलोविन ट्रीट’ असल्याचे चाहते म्हणत आहेत. या चित्रपटाविषयी सांगताना एका चाहत्याने लिहिले की, कतरिना कैफने आपल्या अभिनयाने या संपूर्ण चित्रपटात भाव खाल्ला आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफची व्यक्तिरेखाही अतिशय दमदार वाटली आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहता एकंदरीतच हा चित्रपट लोकांचे भरपूर मनोरंजन करत असल्याचे चित्र दिसते आहे. 'फोन भूत'मधून कतरिना कैफ पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी चित्रपटात नशीब आजमावत आहे. तर, या चित्रपटातील तिच्या लूक आणि कॅरेक्टरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

अगदी चित्रपटाचे मध्यांतर होण्याआधीच प्रेक्षकांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. यात एका चाहत्याने लिहिले की, ‘मी आताच या चित्रपटाचा अर्धा भाग पाहिला आहे आणि पुढील चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.’ तर, आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘कतरिना कैफला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहणे ही आमच्यासाठी पर्वणी आहे.’ दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘फोन भूत हा एक वेगळाच चित्रपट आहे. कतरिना कैफ नेहमीप्रमाणेच कमाल वाटली आहे. तर, सिद्धांत आणि ईशानने देखील तिला चांगली साथ दिली आहे. या चित्रपटातून सिद्धांतचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं आहे.’

विभाग