मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kareena Kapoor: करीना कपूरने केली उर्फी जावेदच्या फॅशनची प्रशंसा, म्हणाली...

Kareena Kapoor: करीना कपूरने केली उर्फी जावेदच्या फॅशनची प्रशंसा, म्हणाली...

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 29, 2023, 04:32 PM IST

  • Urfi Javed: माझ्याकडे उर्फी इतका आत्मविश्वास नाही असे देखील करीनाने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

करीना कपूर खान

Urfi Javed: माझ्याकडे उर्फी इतका आत्मविश्वास नाही असे देखील करीनाने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

  • Urfi Javed: माझ्याकडे उर्फी इतका आत्मविश्वास नाही असे देखील करीनाने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणून अभिनेत्री करीना कपूर खान ओळखली जाते. वयाच्या ४२ व्या वर्षी देखील ती तिच्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेते. करीनाचे लूक सतत चर्चेत असतात. करीनाने नुकताच टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर करीनाने उर्फीचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

करीनाने नुकताच 'टाइम्स नाऊ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला उर्फी जावेदच्या कपड्यांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देत करीना म्हणाली की, 'कुठल्या प्रकारचे कपडे घालायचे किंवा कोणती फॅशन करायची याचे पूर्णपणे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. ज्या आत्मविश्वासाने उर्फी सर्वांसमोर येते त्याचे सर्वांनी कौतुक करायला हवे. मला असे वाटते की ती अतिशय शांत मुलगी आहे आणि अतिशय सुंदर दिसते.'
वाचा: भाजपच्या आमदाराच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा कार्यक्रम

पुढे करीना म्हणाली की, 'सत्य तर हे आहे की उर्फी तिला हवं ते करत असते आणि हिच खरी फॅशन आहे. जेव्हा तुम्ही बिनधास्त असता तेव्हा अगदी सहज असे कपडे घालून सर्वांसमोर येता. मला तिचा आत्मविश्वास आवडतो. मी स्वत: एक अशी मुलगी आहे जिचा स्व:तवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी उर्फीच्या आत्मविश्वासाची तारीफ करते. तिला माझा सलाम.'

उर्फी जावेद सध्या तिच्या फॅशनमुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. एकीकडे तिच्या कपड्यांवरून जोरदार टीका सुरू असताना, दुसरीकडे ती चक्क टॉपलेस होऊन सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देत असते.

विभाग