मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Box Office वर Jug Jugg Jeeyo ची चांगली सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई

Box Office वर Jug Jugg Jeeyo ची चांगली सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई

Payal Shekhar Naik HT Marathi

Jun 24, 2022, 08:56 PM IST

    • (box office collection of jug jugg jiyo)वरुण, कियारासोबत अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.
जुग जुग जियो

(box office collection of jug jugg jiyo)वरुण, कियारासोबत अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.

    • (box office collection of jug jugg jiyo)वरुण, कियारासोबत अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.

लागोपाठ पाच चित्रपट फ्लॉप झाल्यावर अखेर या आज २४ जून रोजी वरुण धवन आणि कियारा आडवाणी च्या 'जुग जुग जियो' (box office collection of jug jugg jiyo)ची चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वरुण, कियारासोबत अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी ऍडव्हान्स बुकिंगने तब्बल ५ कोटींची कमाई केली होती. आता पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटासाठी फार गर्दी केली नसली तरी दिल्ली शहरात प्रेक्षकांची संख्या जास्त दिसून आली आहे. 'भूलभुलैया २' नंतर 'जुग जुग जियो' ने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

यापूर्वी प्रदर्शित झालेला 'भूलभुलैया २' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आलेले 'धाकड़', 'अनेक', 'सम्राट पृथ्‍वीराज', 'जनहित में जारी' आणि 'निकम्‍मा' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकले नाहीत. त्यानंतर आलेल्या 'जुग जुग जियो' मुळे प्रेक्षकांची पावलं पुन्हा सिनेमागृहाकडे वळली आहेत. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९ कोटी २८ लाखांची कमाई केली आहे. तर त्यासोबतच प्रदर्शित झालेल्या पंकज त्रिपाठी यांच्या 'शेरदिल: द पीलीभीत सागा' चित्रपटाला प्रेक्षकांचा खास प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटींची देखील कमाई केलेली नाही.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या नुसरत भरुचा हीच्या 'जनहित में जारी' ने आतापर्यंत ४ कोटी २८ लाखांची कमाई केली आहे. तर शिल्पा शेट्टी आणि अभिमन्यू दासानी याच्या 'निकम्मा' ने आतापर्यंत १ कोटी ७५ लाखांची कमाई केली आहे.

विभाग