मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lata Mangeshkar B'day: 'भारतरत्न' मिळाल्यावरही लता मंगेशकर आनंदी नव्हत्या

Lata Mangeshkar B'day: 'भारतरत्न' मिळाल्यावरही लता मंगेशकर आनंदी नव्हत्या

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 28, 2022, 09:38 AM IST

    • Hrudaynath Mangeshkar: हृदयनाथ मंगेशकर यांनी एका कार्यक्रमात हा खुलासा केला होता.
लता मंगेशकर (HT)

Hrudaynath Mangeshkar: हृदयनाथ मंगेशकर यांनी एका कार्यक्रमात हा खुलासा केला होता.

    • Hrudaynath Mangeshkar: हृदयनाथ मंगेशकर यांनी एका कार्यक्रमात हा खुलासा केला होता.

भारताच्या गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांची आज २८ सप्टेंबर रोजी जयंती. आज लता दीदी आपल्यामध्ये नसल्या तरी यांच्या गाण्यांची जादू प्रेक्षकांवर कायम असणारच आहे. पण एका कार्यक्रमात लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर यांनी भारतरत्न मिळूनही लता मंगेशकर खूश नव्हत्या असे सांगितले होते.

ट्रेंडिंग न्यूज

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हृदयनाथ आणि उषा यांनी लता दीदींविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. लतादीदी आपल्या कुटुंबाच्या खूप जवळ होत्या. त्यांचं त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत घट्ट नाते होते.
आणखी वाचा : आशा पारेख यांनी लग्न का केलं नाही?; कारण ऐकून थक्क व्हाल!

लता दीदींविषयी बोलताना उषा म्हणतात, 'मीना ताई नेहमी लतादीदीसोबत असायची. गाण्यांच्या रेकॉर्डिंगला सुद्धा असायची. स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड झाल्यानंतर लता दीदी मीनाला गाण्याबद्दल विचारायची. जेव्हा मीना तिला सांगायची की गाणे चांगले झाले आहे तेव्हाच ते गाणे पुढे जायचे. दीदीचा मीनावर खूप विश्वास होता.' त्यानंतर हृदयनाथ म्हणाले होते की, 'तिला नेहमी वाटायचे की मला एखादा मोठा पुरस्कार मिळावा. जेव्हा तिला 'भारतरत्न' मिळाला तेव्हा ती आनंदी नव्हती. तिने कुठलाच आनंद व्यक्त केला नाही. पण जेव्हा मला पद्मश्री मिळाला तेव्हा तिने एखाद्या सणासारखा उत्सव साजरा केला होता.'

उषा यांनी लतादीदींबद्दल बोलताना म्हटले होते की, 'ती फक्त एक चांगली गायिका नव्हती तर ती एक समाजसेविका देखील होती. ती जेव्हा जास्त काम करत नव्हती तेव्हा ती चॅरिटी करायची. तिने पुण्यात आशियातील सगळ्यात मोठे आणि परवडणारे हॉस्पिटल बांधले. बॉलिवूडमधील वृद्ध म्युजिशियनसाठी वृद्धाश्रम सुरू करणे हे तिचे स्वप्न होते.'

भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीशी संबंधीत आजारांमुळे ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली होती. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी गाण्यांची जादू प्रेक्षकांवर कायम असणारच आहे.

विभाग