मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar 2023: ऑस्कर मिळल्यानंतर हेमा मालिनी यांनी केले 'RRR'चे कौतुक

Oscar 2023: ऑस्कर मिळल्यानंतर हेमा मालिनी यांनी केले 'RRR'चे कौतुक

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 14, 2023, 02:31 PM IST

    • Hema Malini: अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आनंद व्यक्त केला आहे.
हेमा मालिनी (HT)

Hema Malini: अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आनंद व्यक्त केला आहे.

    • Hema Malini: अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आनंद व्यक्त केला आहे.

नुकताच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरआरआर चित्रपटाचे कौतुक केले. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील आरआरआरचे कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

एका वृत्तवाहिनीशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, 'मला आश्चर्यही वाटलं आणि खूप आनंद झाला आहे की आपल्या देशात असे चित्रपट बनत आहेत. आरआरआर ही चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला आहे. मी पण पाहिला आहे हा सिनेमा. चित्रपटातील गाण्यात दोन अभिनेत्यांनी केलेला डान्स पाहण्यासारखा आहे. त्यांनी उत्कृष्ट डान्स केला आहे. आरआरआरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.'
वाचा: आणि राजामौलींनी पत्नीला मिठी मारली! पाह ऑस्करमधील सोनेरी क्षण

यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा हा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अभिनेत्री मिशेल योहने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होण्याचा मान स्विकारला तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार ब्रेंडन फ्रेझरला मिळाला. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.

विभाग