मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Alia Bhatt Birthday: वयाच्या ६व्या वर्षी आलिया भट्टने केलं बॉलिवूड पदार्पण; ‘हा’ होता पहिला चित्रपट!

Alia Bhatt Birthday: वयाच्या ६व्या वर्षी आलिया भट्टने केलं बॉलिवूड पदार्पण; ‘हा’ होता पहिला चित्रपट!

Mar 15, 2023, 07:45 AM IST

  • Happy Birthday Alia Bhatt: करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हा आलिया भट्टचा पहिला चित्रपट नव्हता.

Alia Bhatt

Happy Birthday Alia Bhatt: करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हा आलिया भट्टचा पहिला चित्रपट नव्हता.

  • Happy Birthday Alia Bhatt: करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हा आलिया भट्टचा पहिला चित्रपट नव्हता.

Happy Birthday Alia Bhatt: बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आज (१५ मार्च) आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. आलियाने आपल्या अभिनयाने नेहमीच सगळ्यांचे भापूर मनोरंजन केले आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हा आलिया भट्टचा पहिला चित्रपट नव्हता. आलियाने वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट नव्हे तर, ‘संघर्ष’ हा आलियाचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात आलिया भट्टने छोट्या प्रिती झिंटाची भूमिका केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

आलियाचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी झाला. आलियाला अभिनयाचा वारसा तिच्या घरातूनच मिळाला आहे. अभिनय तिच्या रक्तातच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लहानपणापासूनच आलिया भट्टला तिची बहीण पूजा भट्टसारखी अभिनेत्री बनायचे होते. आलिया भट्टने आतापर्यंत केलेल्या सर्व चित्रपटांमध्ये ती एका वेगळ्याच रूपात दिसली आहे. या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय दिला आहे.

आलिया भट्ट आता लागोपाठ अनेक सुपरहिट चित्रपट देत आहे. फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी आलियाचे वजन खूप जास्त होते. पण, ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात ग्लॅमरस मुलीची भूमिका साकारण्यासाठी तिने तिच्या वजनावर खूप मेहनत घेतली आहे. आलियाने अवघ्या तीन महिन्यांत तिचे १६ किलो वजन कमी केले होते. आलियाचे वडील अर्थात महेश भट्ट हे गुजराती वंशाचे ब्राह्मण आहेत, तर आई जर्मन वंशाची भारतीय काश्मिरी आहे. मात्र, आलिया भट्टकडे भारतीय नागरिकत्व नाही आणि तिच्याकडे भारतीय पासपोर्टही नाही. आलियाने ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारले आहे.

‘स्‍टुडंट ऑफ द इयर’, ‘हायवे’, ‘टू स्‍टेट्स’, ‘हम्‍टी शर्मा की दुल्‍हनियां’, ‘गली बॉय’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘आरआआर’, ‘गंगुबाई काठियावाडी’ यासारखे तिचे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आलिया भट्टने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरशी लग्नगाठ बांधली असून, ती आता एका चिमुकलीची आई झाली आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांच्या घरात छोट्याशा परीचे आगमन झाले असून, त्यांच्या मुलीचे नाव ‘राहा’ आहे.

विभाग