logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मधुबालाच्या मृत्यूपूर्वी दिलीप कुमारांनी दिलेला शब्द कधीही पूर्ण होऊ शकला नाही

मधुबालाच्या मृत्यूपूर्वी दिलीप कुमारांनी दिलेला शब्द कधीही पूर्ण होऊ शकला नाही

Payal Shekhar Naik HT Marathi

Published Mar 19, 2022 08:19 PM IST

google News
    • 'मधुबाला यांचं पहिलं प्रेम हे दिलीप कुमार होतं, आणि मधुबाला जिवंत असताना ती ते कधीही विसरली नव्हती', असं मधुबालाची बहिण मधूर भुषणने एकदा सांगितलं होतं.
dilip kumar and madhubala (ht)

'मधुबाला यांचं पहिलं प्रेम हे दिलीप कुमार होतं, आणि मधुबाला जिवंत असताना ती ते कधीही विसरली नव्हती', असं मधुबालाची बहिण मधूर भुषणने एकदा सांगितलं होतं.

    • 'मधुबाला यांचं पहिलं प्रेम हे दिलीप कुमार होतं, आणि मधुबाला जिवंत असताना ती ते कधीही विसरली नव्हती', असं मधुबालाची बहिण मधूर भुषणने एकदा सांगितलं होतं.

आजच्या काळातही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्या सुंदरतेची चर्चा होत असते. त्या चित्रपट आणि वैयक्तिक लाईफमुळे प्रचंड चर्चेत राहिल्या. त्याचबरोबर मधुबाला यांचं नाव नेहमीच अनेक लोकांशी जोडलं गेलं. परंतु मीडिया रिपोर्टनुसार मधुबाला या प्रसिध्द अभिनेते दिलीप कुमार यांच्याबरोबर सिरियस रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा त्यावेळी संपूर्ण बॉलिवूडमध्ये होत्या. ते तब्बल 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. ऐन लग्नाच्या वेळी दोघांनी वेगवेगळ्या वाटा पकडल्या होत्या.

मधुबाला यांना ह्रदयविकाराचा आजार होता. त्यामुळं त्यांना सतत त्रास व्हायचा. याच आजारामुळे मधुबालाने वयाच्या 36 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. दिलीप कुमार यांच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर मधुबाला यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. परंतु जिवंत असेपर्यंत तिच्या मनातून दिलीप कुमार गेले नव्हते. त्या सतत त्यांच्या आठवणीत रमायच्या.

मधुबाला यांची बहिण मधुर भुषणने तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. ती म्हणते की 'मधुबालाला सतत दिलीप कुमार यांची आठवण यायची, परंतु मधुबालाला जेव्हा अखेरच्या क्षणी मुंबईत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तेव्हा दिलीप कुमार त्यांना भेटायला आले होते. आणि म्हणाले 'आपण पुन्हा सोबत काम करु'. परंतु त्यांची भेट कधीही होऊ शकली नाही.

मधुबाला त्यांच्या मृत्यूनंतर दिलीप कुमार अंत्यविधीसाठीही गेले होते परंतु ते जाईपर्यंत त्यांचा दफनविधी झाला होता. मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी अनेक प्रसिद्ध आणि तितक्याच गाजलेल्या चित्रपटांत काम केलेलं होतं. त्यात 'मुगल-ए-आजम', ‘तराना’ आणि ‘अमर’ या चित्रपटांचा समावेश आहे.