मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Atiq Ahmed Death: अतिक अहमदच्या मृत्यूनंतर स्वरा भास्करचे सरकारवर ताशेरे; ट्वीट करत म्हणाली...

Atiq Ahmed Death: अतिक अहमदच्या मृत्यूनंतर स्वरा भास्करचे सरकारवर ताशेरे; ट्वीट करत म्हणाली...

Apr 16, 2023, 08:51 AM IST

  • Swara Bhasker On Atiq Ahmed Death: स्वरा भास्कर नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर आपलं रोखठोक मत व्यक्त करत असते. आता देखील तिने या प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Swara Bhasker

Swara Bhasker On Atiq Ahmed Death: स्वरा भास्कर नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर आपलं रोखठोक मत व्यक्त करत असते. आता देखील तिने या प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

  • Swara Bhasker On Atiq Ahmed Death: स्वरा भास्कर नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर आपलं रोखठोक मत व्यक्त करत असते. आता देखील तिने या प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Swara Bhasker On Atiq Ahmed Death: उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येचे प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. शनिवारी या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली. आता या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. स्वरा भास्कर नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर आपलं रोखठोक मत व्यक्त करत असते. आता देखील तिने या प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा दोन्ही माफियांना वैद्यकीय उपचारासाठी नेले जात होते, तेव्हा गोळीबार करून अतिक आणि अशरफ यांची हत्या करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

स्वरा भास्करने ट्विट करून लिहिले की, 'अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक, ही काही सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही.हे अराजकतेचे लक्षण आहे. राज्याच्या यंत्रणा गुन्हेगारांप्रमाणे वागत असल्याने किंवा त्यांना सक्षम करत असल्याने त्यांची विश्वासार्हता संपल्याचे लक्षण आहे. हा चांगला कारभार नाही, ही अराजकता आहे.’

स्वरा भास्कर नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर आपली बाजू मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वीच अतिक अहमदचा मुलगा असद अहमद याचा एन्काउंटर झाला होता. या घटनेवर देखील स्वरा भास्कर आणि तिचा पती सपा नेता फहाद अहमद यानेही प्रतिक्रिया दिली होती. असद अहमद एन्काउंटर प्रकरणावर आपले म्हणणे मांडताना फहाद म्हणाला होता की, ‘अनेकांना असे वाटते की असद अहमद चकमकीला तो मुस्लिम आहे म्हणून आम्ही विरोध करत आहोत. पण हा गैरसमज आहे. आम्ही विकास दुबेचा एन्काऊंटरही साजरा केला नाही आणि इतर कोणाचाही करणार नाही. समस्या तुमची आहे. तुमचा संविधान आणि संस्थांवर विश्वास नाही.’

विभाग