मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 16, 2023 08:10 AM IST

The Kapil Sharma Show Latest Update: कपिल शर्माचा हा कॉमेडी शो तात्पुरता बंद होणार असून, लवकरच त्याचा शेवटचा भाग शूट केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

Kapil Sharma
Kapil Sharma

The Kapil Sharma Show Latest Update: कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्मा अनेक वर्षांपासून आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो. त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ हा नेहमीच टीआरपी चार्टवर पहिल्या क्रमांकावर दिसतो. मात्र, आता या शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कपिल शर्माचा हा कॉमेडी शो तात्पुरता बंद होणार असून, लवकरच त्याचा शेवटचा भाग शूट केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. ही बातमी समोर येताच चाहते अस्वस्थ झाले. मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘द कपिल शर्मा शो’ जूनच्या अखेरीस बंद होऊ शकतो. निर्माते लवकरच या शोच्या शेवटच्या एपिसोडच्या प्रसारणाची तारीख घोषित करतील. गेल्या काही काळापासून कपिल शर्मा आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच कदाचित हा शो तात्पुरता बंद करण्यात येत आहे. त्याच वेळी, निर्मात्यांना या ब्रेक दरम्यान शो आणि त्यातील पात्रांमध्ये काही चांगले बदल करण्याची संधी देखील मिळेल. मात्र, मेकर्स किंवा शोच्या टीमकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

अद्याप या शोची शेवटची तारीख ठरलेली नाही. मात्र, संपूर्ण टीम मे महिन्यात शूट पूर्ण करण्याची शक्यता आहे आणि या सीझनचा शेवटचा भाग जूनमध्ये प्रसारित केला जाऊ शकतो. दुसरीकडे, कपिल शर्माचा आंतरराष्ट्रीय दौरा आहे आणि त्यामुळे यावेळी ब्रेक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ब्रेकचा कालावधी अद्याप ठरलेला नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, द कपिल शर्मा शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, 'शोमध्ये अशाप्रकारे ब्रेक घेणे शोसाठी खरोखर फायदेशीर ठरले आहे. अशा ब्रेक्समुळे कंटेंट आणि कलाकारांच्या बाबतीत काही गोष्टी सुधारण्याची संधी मिळाली. तसेच, कॉमेडी हा एक अतिशय कठीण प्रकार आहे आणि कलाकारांना ब्रेक आवश्यक आहे.’ याआधी देखील या शोने एक मोठा ब्रेक घेतला होता. मात्र, त्यांनतर नव्या ताकदीने ‘द कपिल शर्मा शो’ मोठ्या पडद्यावर परतला होता. आता हा शो पुन्हा एकदा ऑफ एअर जाणार हे ऐकून चाहते देखील नाराज झाले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग