मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  इंटीमेट सीन शूटिंगदरम्यान...; बॉबी देओलने सांगितला ईशा गुप्तासोबतचा अनुभव

इंटीमेट सीन शूटिंगदरम्यान...; बॉबी देओलने सांगितला ईशा गुप्तासोबतचा अनुभव

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 26, 2022, 11:09 AM IST

    • आश्रम ३ या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत.
बॉबी देओल (HT)

आश्रम ३ या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत.

    • आश्रम ३ या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असणारी 'आश्रम' ही एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज विशेष गाजली होती. या वेबसीरिजचे दोन सिझन सुपरहिट ठरल्यानंतर तिसऱ्या सिझनच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. ३ जून रोजी या सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील कलाकार हे चर्चेत होते. या सीरिजमधील अभिनेत्री ईशा गुप्ता आणि बॉबी देओलने काही इंटिमेट सीन्स दिले आहेत. ते देतानाचा अनुभव बॉबी देओलने सांगितला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

बॉबी देओलने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ईशा देओलसोबत इंटीमेट सीन शूट करण्याचा अनुभव सांगितला आहे. 'इंटीमेट सीन शूट करताना मी नव्हर्स होतो. पण ईशाने मला कम्फर्टेबल फिल करुन दिलं आणि सगळं सोपं झालं. मला आठवतय जेव्हा मी पहिल्यांदा इंटीमेट सीन शूट केला तेव्हा खूप घाबरलो होतो. ईशा खूप प्रोफेशनल होती. त्यामुळे सीन खूप नीट शूट करता आला' असे बॉबी म्हणाला.

पुढे बॉबी म्हणाला, “मी पडद्यावर निगेटिव्ह रोल करण्यासाठी प्रचंड घाबरायचो. पण लोकांनी माझ्या भूमिकेला इतका सकारात्मक प्रतिसाद दिला हे ऐकून मी आनंदी आहे. मला आनंद आहे की आता मला जास्तीत जास्त वेगळे आणि आव्हानात्मक भूमिका करण्यास मिळतील.”

आश्रम ३ या वेबसीरिजमधील बॉबी देओल, ईशा गुप्ता, त्रिधा चौधरी, अदिती पोहणकर यांसह सर्वांच्या अभिनयाचे कौतुक केले गेले. ईशा गुप्ताने या सीरिजमध्ये सोनिया ही व्यक्तीरेखा साकारली आहे. ती बाबा निरालाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते. दरम्यान, तिला अनेक इंटीमेट सीन्स द्यावे लागले आहेत.

विभाग