मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: शिव ठाकरे आणि प्रियांका चौधरीला मागे टाकत ‘ही’ स्पर्धक ठरली पहिली फायनलिस्ट!

Bigg Boss 16: शिव ठाकरे आणि प्रियांका चौधरीला मागे टाकत ‘ही’ स्पर्धक ठरली पहिली फायनलिस्ट!

Jan 30, 2023, 11:59 AM IST

    • Bigg Boss 16 update: येत्या १२ फेब्रुवारीला बिग बॉस १६चा फिनाले पार पडणार आहे यामध्ये एका सदस्याने आपली जागा निश्चित केली आहे.
bigg boss 16

Bigg Boss 16 update: येत्या १२ फेब्रुवारीला बिग बॉस १६चा फिनाले पार पडणार आहे यामध्ये एका सदस्याने आपली जागा निश्चित केली आहे.

    • Bigg Boss 16 update: येत्या १२ फेब्रुवारीला बिग बॉस १६चा फिनाले पार पडणार आहे यामध्ये एका सदस्याने आपली जागा निश्चित केली आहे.

Bigg Boss 16 update:बिग बॉस १६’ला या सीझनचा पहिला फायनलिस्ट मिळाला आहे आणि त्यासोबत आता फिनालेच्या स्पर्धेची चुरस देखील आणखी वाढली आहे. गेल्या आठवड्यात टीना दत्ताला शोमधून एलिमिनेट करण्यात आले होते आणि आता या घरात ७ स्पर्धक राहिले आहेत. यापैकी शिव ठाकरे किंवा प्रियांका चहर चौधरी या दोघांनाही अंतिम फेरीत अद्याप आपले स्थान मिळवता आलेले नाही. मात्र, या दोघांना मागे टाकत एका सदस्याने फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

येत्या १२ फेब्रुवारीला बिग बॉस १६चा फिनाले पार पडणार आहे यामध्ये एका सदस्याने आपली जागा निर्माण केली आहे, ही स्पर्धक आहे निमृत कौर. निमृत कौर पुन्हा एकदा घराची कॅप्टन बनली आहे आणि या आठवड्यात तिचे फिनालेचे तिकीटही निश्चित झाले आहे. बिग बॉसने जेव्हा तिकीट टू फिनाले टास्कची घोषणा केली, तेव्हा प्रियंका आणि अर्चनाने टास्क करण्यास नकार दिला, परिणामी टास्क रद्द झाला आणि निमृतला सहज फिनालेचे तिकीट मिळाले.

बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत एलिमिनेट झालेल्या अनेक स्पर्धकांना असे वाटत आहे की, बिग बॉसने जाणूनबुजून असे टास्क डिझाईन केले की, कोणीही निमृतकडून तिचे फिनालेचे तिकीट काढून घेऊ शकले नाही. त्यामुळे अर्चना आणि प्रियांका यांनी देखील हा टास्क करण्यास नकार दिला. प्रियांका आणि शिव हे घरातील सर्वात तगडे मानले जातात. परंतु, दोघांपैकी फिनालेला कोण जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

निमृत कौरचे फिनालेचे तिकीट निश्चित झाले असून, ती या शोची पहिली फायनलिस्ट ठरली आहे. त्यानंतर आता अर्चना गौतम आणि प्रियांका चौधरी यांनी तिच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अर्चना आणि निमृत या दोघी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. या शोची रंगत आता आणखी वाढणार आहे.