मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arya Ambekar: आर्या आंबेकरने गायिलेले "गेट टुगेदर"मधील गाणे पाहिलेत का?

Arya Ambekar: आर्या आंबेकरने गायिलेले "गेट टुगेदर"मधील गाणे पाहिलेत का?

Aarti Vilas Borade HT Marathi

May 19, 2023, 09:35 AM IST

    • Get Together: "गेट टुगेदर" हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे
Get Together

Get Together: "गेट टुगेदर" हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे

    • Get Together: "गेट टुगेदर" हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे

शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न ‘गेट टुगेदर’ या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे आर्या आंबेकरने गायिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

"गेट टुगेदर" या चित्रपटातील रूप सजलया हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. आर्या आंबेकर, अजय रणपिसे यांनी हे गाणं गायलं असून, हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव "गेट टुगेदर'" हा चित्रपट नव्याने करून देतो. रोमान्स, भावभावनांचा कल्लोळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये पहिल्या प्रेमासाठी केली मजामस्ती, त्यावेळचा अल्लडपणा, हळवेपणा पुढे पुढे या नात्याला अनेक रंग कसे येत जातात याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. रूप सजलया हे गाणंही अशाच हळूवार भावना मांडणारं आहे. उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, आर्या आंबेकर, अजय रणपिसे यांचा अप्रतिम आवाज या गाण्याला लाभला आहे. त्यामुळे या गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळेल यात शंका नाही.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत ‘गेट टुगेदर’ या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांचे आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, जावेद अली, गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे यांनी चित्रपटातली सुमधुर गाणी गायली आहेत. चित्रपटात प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. या गाण्यांना आणि नुकत्याच लाँच केलेल्या ट्रेलरला सोशल मीडियातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

विभाग