मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil : गौतमी पाटीलला अमोल कोल्हेंचा पाठिंबा, म्हणाले, "ती अजूनही लहान..."

Gautami Patil : गौतमी पाटीलला अमोल कोल्हेंचा पाठिंबा, म्हणाले, "ती अजूनही लहान..."

Aarti Vilas Borade HT Marathi

May 30, 2023, 02:51 PM IST

    • Amol Kolhe: गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. त्यावर आता अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Gautami Patil

Amol Kolhe: गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. त्यावर आता अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    • Amol Kolhe: गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. त्यावर आता अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यभरात तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या व मार्केट जाम करणारी लावणी डान्सर म्हणजे गौतमी पाटील. तिच्या कातिला अदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या सर्वत्र गौतमीची चर्चा करत आहेत. नुकताच गौतमीच्या अडनावावरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता अभिनेते अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सरोजने कलासाठी आखला मोठा डाव, अद्वैतला कळताच काय होणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत

‘ठरलं तर मग’च्या चाहत्याने पात्रांवरून ठेवली चिमुकल्या पाहुण्यांची नावं! अभिनेत्याने शेअर केला भन्नाट किस्सा

कार्तिकने घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यास दिला नकार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असणार सागरचे पुढचे पाऊल

अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा!; 'महाराष्ट्र दिनी' गायत्री दातारने केलेली पोस्ट चर्चेत

राजकीय वर्तुळातून अनेकजण गौतमी पाटीलच्या आडनावावरुन सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांचे मत मांडत गौतमीच्या कलेचा आदर समाजाने केला पाहिजे तसेच यशाच्या शिखरावर गौतमी असताना तिला समाजाने पाठिंबा दिला पाहिजे असे म्हटले आहे.

“लावणी नृत्यांगणा म्हणून आज गौतमी पाटील यांची प्रचंड क्रेझ आहे. कलाक्षेत्रामध्ये यश हे कायम कलाकाराबरोबर नसते. प्रत्येक कलाकाराला याचा सामना करावा लागतो. आज गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. त्यामुळे मी सगळ्यांना एकच सांगतो की, कलाकार म्हणून त्या त्यांची कला सादर करत आहेत. तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यापेक्षा कलाकाराची कुचंबना होऊ नये असे मला वाटते” असे अमोल कोल्हे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “गौतमी पाटील यांचे वय अजूनही खूप लहान आहे. त्यामुळे मिळालेले यश पचवणे फार अवघड असते. यश पचवण्यासाठी समाजाने त्यांना मदत करायला हवी. त्यांच्या अदांवर ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात फिदा आहेत. त्यांच्या कार्यक्रमांनाही प्रचंड गर्दी होत आहे. यामध्ये कोणतेही विषय आणून विरोध करु नका. मी काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेली मुलाखत पाहिली. ज्यावेळी त्यांची हालाखीची परिस्थिती होती त्यावेळी हे जे त्यांना ट्रोल करतायेत ते दोन वेळेचे अन्न द्यायला जात नव्हते. आज जर हिच महिला तिच्या कतृत्त्वाच्या, कलेच्या जोरावर पुढे जात आहे तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण?”

काय आहे नेमका वाद?

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. राजेंद्र जराड पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये “गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही” असा ईशा दिला. त्यावर गौतमीने “पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार” असे बेधडक उत्तर दिले. तिच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले.