मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉक्स ऑफिसवर 'पृथ्वीराज' चे हाल बेहाल, अक्षयच्या मानधनाएवढीही कमाई नाही

बॉक्स ऑफिसवर 'पृथ्वीराज' चे हाल बेहाल, अक्षयच्या मानधनाएवढीही कमाई नाही

Payal Shekhar Naik HT Marathi

Jun 10, 2022, 01:03 PM IST

    • ३ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एका आठवड्यात फक्त ५० कोटींची मजल मारली आहे.
पृथ्वीराज

३ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एका आठवड्यात फक्त ५० कोटींची मजल मारली आहे.

    • ३ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एका आठवड्यात फक्त ५० कोटींची मजल मारली आहे.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar)याच्या 'पृथ्वीराज' (pruthviraj) चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी प्रचंड चर्चा होती. राजपूत राजा सम्राट पृथ्वीराज याची शौर्यगाथा जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. मात्र चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच अक्षयच्या भूमिकेला नेटकऱ्यांनी नाकारलं. अक्षय सम्राट पृथ्वीराज या भूमिकेसाठी मुळीच योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. आणि आता त्याचा परिणामही बॉक्स ऑफिसवर दिसतोय. ३ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एका आठवड्यात फक्त ५० कोटींची मजल मारली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

अक्षयचा चित्रपट, भव्य दिव्य सेट, उत्कृष्ट अभिनय करणारे कलाकार असं सगळं असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडायला असमर्थ ठरला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारलं असंच म्हणावं लागेल. गेल्या आठवड्याभरात या चित्रपटाने फक्त ५५ कोटींचा गल्ला जमावला आहे. ३०० कोटींच्या बजेट मध्ये तयार झालेल्या या चित्रपटाची कमाई मात्र फार कमी आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या सोबतीने प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन याचा 'भूलभुलैया २' मात्र जोरदार कमाई करताना दिसतोय. या चित्रपटासाठी अक्षयने तब्बल ६० कोटींचं मानधन घेतल्याचं बोललं जातं. मात्र हा चित्रपट अक्षयच्या मानधनाइतकेही पैसे कमावण्यास असमर्थ ठरला आहे.

पहिल्याच दिवशी चित्रपटाने १० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी १२ कोटी अन तिसऱ्या दिवशी १६ कोटींची कमाई केली. त्यानंतर मात्र चित्रपटाच्या कमाईत कमालीची घसरण झाली. या चित्रपटाने सोमवारी ५ कोटी, मंगळवारी ४ कोटी अन बुधवारी फक्त २. ५० कोटींची कमाई केली. आता तर अनेक चित्रपटगृहांतून 'सम्राट पृथ्वीराज' चे शो रद्द करण्यात येत आहेत. हे आकडे पाहून 'सम्राट पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असंच म्हणावं लागेल.