मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adipurush: 'लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून...', आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतचे वक्तव्य

Adipurush: 'लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून...', आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतचे वक्तव्य

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 05, 2022, 09:47 AM IST

    • Om Raut: सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेक अनेक मीम्स व्हायरल झाले होते. आता दिग्दर्शक ओम राऊतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आदिपुरुष (HT)

Om Raut: सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेक अनेक मीम्स व्हायरल झाले होते. आता दिग्दर्शक ओम राऊतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    • Om Raut: सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेक अनेक मीम्स व्हायरल झाले होते. आता दिग्दर्शक ओम राऊतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'आदिपुरुष.' या चित्रपटाचा टीझर २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. टीझरमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर अनेक अनेक मीम्स व्हायरल झाले होते. आता चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report

साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?

सोशल मीडियावर 'आदिपुरुष'बाबात अनेक निगेटीव्ह चर्चा रंगल्या आहेत. तसेच व्हायरल होणारे मीम्स पाहून ओम राऊतला वाईट वाटले. पण या गोष्टींकडे तो फार लक्ष देत नसल्याचे देखील त्याने स्पष्ट केले. जेव्हा प्रेक्षक हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहतील तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतील असे ओम राऊत म्हणाला.
वाचा : चित्रपट आहे की कार्टून; व्हीएफएक्समुळे ‘आदिपुरुष’ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

ओम राऊतने 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता 'आदिपुरुष'बाबत बोलताना ओम राऊत म्हणाला, 'मला हे सर्व पाहून दु:ख नक्कीच झाले. हा चित्रपट मोठ्या पडद्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर किंवा मोबाईल पाहताना याचा यंदाज लावणे असंभ आहे. मी सध्याच्या परिस्थितीला कंट्रोल नाही करु शकत. यूट्यूबवर प्रदर्शित न करण्याचा पर्याय मला देण्यात आला होता. पण सर्व गोष्टींचा विचार करुन मी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी मी तो यूट्यूबवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला' असे ओम राऊत यांनी म्हटले.

पुढे तो म्हणाले, 'माझे पार्टनर टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर जगभरातील सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची गरज आहे आणि जेव्हा त्यांच्या पर्यंत चित्रपटाचे प्रमोशन पोहोचणार नाही तो पर्यंत ते चित्रपटगृहापर्यंत येणार नाहीत. आम्हाला वेगवेगळ्या वयोगटीतील प्रेक्षकांची गरज आहे. टीझर होणाऱ्या टीकेकडे मी दुर्लक्ष करतो कारण लोक ते छोट्या पडद्यावर पाहात आहेत.'

आदिपुरुष' चित्रपटात मोठ्या प्रमाणावर विएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये प्रभास प्रभू राम यांच्या भूमिकेत आहे. क्रिती सेनॉनने जानकीची, तर सैफ अली खानने लंकेशची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याशिवाय देवदत्त नागे या मराठमोळ्या अभिनेत्याने चित्रपटामध्ये महत्त्वाचे पात्र साकारले आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी केली आहे.

विभाग