मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: कांचन आणि अप्पांनी मानले आशुतोषचे आभार, काय आहे प्रकरण?

Aai Kuthe Kay Karte: कांचन आणि अप्पांनी मानले आशुतोषचे आभार, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi

May 30, 2023, 04:35 PM IST

    • Aai Kuthe Kay Karte serial update: आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कांचन आणि अप्पा आशुतोषचे आभार मानताना दिसत आहे. आता त्यांनी आभार का मानले हे जाणून घ्या...
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte serial update: आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कांचन आणि अप्पा आशुतोषचे आभार मानताना दिसत आहे. आता त्यांनी आभार का मानले हे जाणून घ्या...

    • Aai Kuthe Kay Karte serial update: आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कांचन आणि अप्पा आशुतोषचे आभार मानताना दिसत आहे. आता त्यांनी आभार का मानले हे जाणून घ्या...

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत सध्या सर्व देशमुख कुटुंबीय चिंतेत आहेत. कारण यशचा अपघात झाला आहे. त्याला नुकताच रुग्णालयातून घरी आणण्यात आले. त्यानंतर पोलीस घरी येतात आणि देशमुख कुटुंबीयांना सांगतात की, 'आम्हाला यश देशमुखला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याची ऑर्डर मिळाली आहे. यश देशमुखने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.' त्यावर देशमुख कुटुंबीय पोलिसांना माहिती देतात की, 'यशचा अपघात झाला.' सध्या मालिका एक वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

स्टार प्रवाह वाहिनीने आई कुठे काय करते मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कांचन आणि अप्पा आशुतोषचे आभार मानताना दिसत आहेत. आशुतोष म्हणतो की 'मी निघतो. यशची सगळी औषधे मी ईशाकडे दिली आहेत. यश आता आराम करतोय. तुम्ही देखील आराम करा' यावर अप्पा म्हणतात, 'कसे आराम करणार, यश समोर जायची सुद्धा भिती वाटते. पोलीस म्हणाले ते सगळे खरे असेल तर मी काय तोंड घेऊन त्याच्या समोर जाऊ. यशसारख्या उत्साही तरुणानी असा विचार केला तर ते आमच्या सगळ्यांचे अपयश आहे. माझे अपयश आहे.'

त्यावर आशुतोष अप्पांना समजावतो. 'अप्पा, यशने असे काहीही केलेले नाही. यशला उपचाराची गरज आहे. यश ज्या वयातून जात आहे त्या वयातून आपण सर्वजण गेलो आहोत. परीक्षेत नापास झालो, कामात यश आले नाही तर काय करायचे याचा सल्ला आपण देतो. पण हेच जर नात्यांच्याबाबत घडले तर, म्हणजेच नाती तुटली, माणसे लांब गेली तर त्यातून कसे बाहेर यायचे, याचे शिक्षण कुठेच मिळत नाही' असे यश म्हणतो.

पुढे कांचन आशुतोषचे आभार मानात म्हणते, 'मला तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये. यशला घरी आणण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? हे मला आता कळतंय. योग्यवेळी तुम्ही त्याला घरी घेऊन नसता आला, तर आजची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागली असती.'

विभाग