मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  PIFF: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही मराठीचा डंका; स्पर्धात्मक विभागात ‘या’ चित्रपटांची वर्णी!

PIFF: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही मराठीचा डंका; स्पर्धात्मक विभागात ‘या’ चित्रपटांची वर्णी!

Jan 24, 2023, 08:13 AM IST

    • Pune International Film Festival: २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे.
PIFF

Pune International Film Festival: २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे.

    • Pune International Film Festival: २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे.

Pune International Film Festival: पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केली. याबरोबरच विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत यावर्षी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचे ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report

यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता हे देखील या वेळी उपस्थित होते. यंदा २ ते ९ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मुकुंदनगर येथील थिएटर अकादमी, सकल ललित कलाघर या ठिकाणी गुरुवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता महोत्सवाचा उद्घाटन समारंभ तर, गुरुवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता महोत्सवाचा समारोप समारंभ संपन्न होईल, असेही डॉ. पटेल यांनी सांगितले.

अली अब्बासी दिग्दर्शित ‘होली स्पायडर’ यावर्षीची ओपनिंग फिल्म म्हणून तर, ‘फायनल कट’ ही दिग्दर्शक मिशेल हाजानाविसियस यांची फिल्म क्लोजिंग फिल्म म्हणून दाखवण्यात येणार आहे. यावेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, ‘काही तांत्रिक कारणामुळे यावर्षी लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या ठिकाणी महोत्सवातील चित्रपट दाखवण्यात येणार नाहीत. त्याऐवजी कॅम्प परिसरातील आयनॉक्स या ठिकाणी आणखी एक स्क्रीन वाढवण्यात आली आहे.’

यावर्षीच्या पिफमध्ये स्पर्धात्मक विभागात मराठी चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या विभागात निवड झालेल्या मराठी चित्रपटांची यादी-

* मदार (दिग्दर्शक – मंगेश बदार)

* ग्लोबल आडगांव (दिग्दर्शक – अनिल कुमार साळवे)

* गिरकी (दिग्दर्शक – कविता दातीर आणि अमित सोनावणे)

* टेरेटरी (दिग्दर्शक – सचिन श्रीराम मुल्लेम्वार)

* डायरी ऑफ विनायक पंडित (दिग्दर्शक – मयूर शाम करंबळीकर)

* धर्मवीर: मुक्कम पोस्ट ठाणे (दिग्दर्शक – प्रवीण विठ्ठल तरडे)

* पंचक (दिग्दर्शक – जयंत जठार आणि राहुल आवटे)

विभाग