मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  1920 Horrors Of The Heart: '१९२० हॉरर ऑफ द हार्ट' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिलात का?

1920 Horrors Of The Heart: '१९२० हॉरर ऑफ द हार्ट' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 21, 2023, 12:04 PM IST

    • 1920 Horrors Of The Heart Trailer: '१९२० हॉरर ऑफ द हार्ट' या चित्रपटात अभिनेत्री अविका गोर महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
1920 Horrors Of The Heart

1920 Horrors Of The Heart Trailer: '१९२० हॉरर ऑफ द हार्ट' या चित्रपटात अभिनेत्री अविका गोर महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

    • 1920 Horrors Of The Heart Trailer: '१९२० हॉरर ऑफ द हार्ट' या चित्रपटात अभिनेत्री अविका गोर महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गोर आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ती लवकरच '१९२० हॉरर ऑफ द हार्ट' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

'१९२० हॉरर ऑफ द हार्ट' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात गार्डनमध्ये झोपाळा हलत असल्याचे दाखून करण्यात आली आहे. त्यानंतर अविका गोर वडीलांच्या आणि आईच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी येते. ती ज्या घरात राहते तेथे भूत असल्याचे दाखवण्यात आले आहे. काही सीन्स असे आहेत जे पाहून अंगावर काटा येतो. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

१९२० हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग '१९२० हॉरर ऑफ द हार्ट' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कृष्णा भट्टने चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत 'ट्रेलर आला आहे.. भीतीच्या अंधारात असेच काहीसे घडते..' असे कॅप्शन दिले आहे.

विभाग