मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Fixed Deposit : केवळ ७०० दिवसांच्या एफडीवर मिळतोय ९ टक्के व्याज, इथे चेक करा डिटेल्स

Fixed Deposit : केवळ ७०० दिवसांच्या एफडीवर मिळतोय ९ टक्के व्याज, इथे चेक करा डिटेल्स

Mar 02, 2023, 12:41 PM IST

    • Fixed Deposit : आपल्या आयुष्यभराच्या कमाईवर अधिक नफा कमावण्याचा इरादा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या आठ फेब्रुवारीला आरबीआय़ने पुन्हा एकदा रेपो दरात २५ बेसिस पाॅईंट्सची वाढ केली आहे.
Fixed deposits HT

Fixed Deposit : आपल्या आयुष्यभराच्या कमाईवर अधिक नफा कमावण्याचा इरादा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या आठ फेब्रुवारीला आरबीआय़ने पुन्हा एकदा रेपो दरात २५ बेसिस पाॅईंट्सची वाढ केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

व्याजदरातील वाढीमुळे सरकारी तसेच खाजगी बँकांशिाय स्माॅल फायनान्स बँकांनीही आपल्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. यात उत्कर्ष स्माॅल फायनान्स बँकेने २ कोटींपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

स्माॅल फायनान्स बँकेने वाढवले दर

व्याजदरातील वाढीनंतर बँक ग्राहकांना ४ ते ७ टक्के दराने व्याज देत आहे. तर बँक याच कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के ते ७.७५ टक्के व्याज देत आहे. दुसरीकडे बँक ७०० दिवसांच्या स्पेशल एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना अधिकाधिक ८.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्के व्याज देत आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, वाढीव सुधारित व्याजदर २७ फेब्रुवारीपासून लागू होतील.

या बँकांमध्ये ८.२५ टक्के व्याज

व्याज दराच्या वाढीनंतर ७ दिवस ते ४५ दिवसांच्या एफडीवर ४ टक्के, ४६ दिवस ते ९० दिवसांच्या कालावधीत ४.७५ टक्के, ९१ दिवस ते १८० दिवसांच्या कालावधीवर ५.५० टक्के, १८१ दिवस ते ३६४ दिवसांच्या एफडीवर ६.५० टक्के व्याजदर दिले जाणार आहे. दुसरीकडे बँक ३६५ दिवस ते ६९९ दिवसांच्या एफडीवर ७.७५ टक्के, ७०० दिवसांच्या एफडीवर ८.२५ टक्के, ७०१ दिवस ते ५ वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर ७.५० टक्के, ५ वर्षे आणि त्यावरील १० वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर ७ टक्के व्याजदर मिळणार आहे.

विभाग