मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank Stocks : शेअर्स खरेदीच्या विचारात आहात ? हे बॅक स्टाॅक्स देतील जबरदस्त परतावा, पहा लिस्ट

Bank Stocks : शेअर्स खरेदीच्या विचारात आहात ? हे बॅक स्टाॅक्स देतील जबरदस्त परतावा, पहा लिस्ट

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 02, 2023 10:25 AM IST

Bank Stocks : सिटी यूनियन बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, बंधन बँक, अॅक्सिस बँकेच्या शेअर्सना सध्या अच्छे दिन आले आहेत.त्यामुळे या स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या तिमाही पतधोरणानंतर या बँकांच्या नफ्यात वाढ झाली आहे.

stocks to watch HT
stocks to watch HT

Bank Stocks : : सिटी यूनियन बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, बंधन बँक, अॅक्सिस बँकेच्या शेअर्सना सध्या अच्छे दिन आले आहेत.त्यामुळे या स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या तिमाही पतधोरणानंतर या बँकांच्या नफ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी दिवसात बँकिंग स्टाॅक्समध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

हे आहे टार्गेट प्राईस

स्टेट बँकेच्या शेअर्समध्ये बुधवारी २.५७ टक्के वाढीसह ५३६.२५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते स्टेट बँकेसाठी ७११ रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे. तर सिटी यूनियन बँक येणाऱ्या दिवसात १९५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. हा दर १४१.५० रुपयांपेक्षा ४० टक्के वर आहे. तर बंधन बँकेचा टार्गेट प्राईस ३११ रुपये ठेवण्यात आला आहे. बुधवारी या कंपनीचा शेअर्स २३५.०५ रुपयांवर बंद झाला. अॅक्सिस बँकेचा स्टाॅक बुधवारी २.४० टक्के वर बंद झाला.. ब्रोकरेज फर्म्सने त्याचे टार्गेट प्राईस १११० रुपये ठेवले आहे याचप्रमाणे इंडसएंड बँकेचे टार्गेट प्राईज १४३० रुपये आहे.

स्टेट बँक प्राईस हिस्ट्री

या वर्षी स्टेट बँकेने १२.४१टक्के नेगेटिव्ह रिटर्न्स दिले आहेत. तर गेल्या पाच दिवसात चांगला परतावा दिला आहे. या शेअर्सचा ५२ आठवड्यातील उच्चांक ६२९.५५ रुपये आणि निचांक ४२५ रुपये आहे.

अॅक्सिस बँक स्टाॅक प्राईस हिस्ट्री

अॅक्सिस बँकेच्या स्टाॅकमध्ये गेल्या पाच दिवसात ४ टक्के रिटर्न्स दिले आङेत. तर गेल्या वर्षभरात शेअर्सनी ८.२० टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यात स्टाॅकने १५ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिा आहे. ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी ९७० रुपये तर निचांकी पातळी ६१८.२५ रुपये आहे.

सिटी यूनियन प्राईस हिस्ट्री

या वर्षभरात सिटी यूनियन्सच्या शेअर्समध्ये २० टक्के घट झाली आहे. गेल्या ५ दिवसांत ८ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यात शेअर्समध्ये २२ टक्के घट झाली आहे. त्याचा ५२ आठवड्यातील उच्चांक २०५ रुपये आणि निचांक पातळी १०९ रुपये आहे. तर बंधन बँक स्टाॅकमध्ये वर्षभऱात २.१२ टक्के घट झाली आहे. या स्टाॅक्सचा ५२ आठवड्यातील उच्चांक ३४९.५५ रुपये आणि निचांक २०९.५५ रुपये आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग