मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Funds : म्युच्युअल फंडांचा हा स्टाँक फेवरेट, FPI नी खरेदी केले लाखोंचे शेअर्स,असा होईल फायदा

Mutual Funds : म्युच्युअल फंडांचा हा स्टाँक फेवरेट, FPI नी खरेदी केले लाखोंचे शेअर्स,असा होईल फायदा

Mar 19, 2023, 12:19 PM IST

    • Mutual Funds : वेनगार्ड आणि नाॅर्वेजियन नाॅर्जेस बँकेने ओपन मार्केटद्वारे इक्विटास स्माॅल फायनान्स बँकेत हिस्सेदारी खरेदी केली आहे. हा स्टाॅक म्युच्युअल फंडांमध्येही फेवरेट आहे.
mutual funds HT

Mutual Funds : वेनगार्ड आणि नाॅर्वेजियन नाॅर्जेस बँकेने ओपन मार्केटद्वारे इक्विटास स्माॅल फायनान्स बँकेत हिस्सेदारी खरेदी केली आहे. हा स्टाॅक म्युच्युअल फंडांमध्येही फेवरेट आहे.

    • Mutual Funds : वेनगार्ड आणि नाॅर्वेजियन नाॅर्जेस बँकेने ओपन मार्केटद्वारे इक्विटास स्माॅल फायनान्स बँकेत हिस्सेदारी खरेदी केली आहे. हा स्टाॅक म्युच्युअल फंडांमध्येही फेवरेट आहे.

Mutual Funds : गेल्या आठवड्यात परकीय गुंतवणूकदारांनी इक्विटास स्माॅल फायनान्स बँकेचे शेअर्स खरेदी केले आहेत. वेनगार्ड आणि नाॅर्वेजियन नाॅर्जेस बँकेने ओपन मार्केटद्वारे इक्विटास स्माॅल फायनान्समध्ये हिस्सा खरेदी केला आहे. इक्विटास बँकेचा स्टाॅक हा म्युच्युअल फंडांमध्येही लोकप्रिय आहे. अनेक म्युच्युअल फंडांनी या स्माॅल फायनान्स बँकेत गुंतवणूक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

वेनगार्ड आणि नाॅर्जेस बँकेने इतके कोटींचे खरेदी केले शेअर्स

वेनगार्ड टोटल इंटरनॅशनल स्टाॅक इंडेक्सने इक्विटास स्माॅल फायनान्स बँकेचे ५७.१९ लाख शेअर्स किंवा अर्धा टक्का हिस्सा खरेदी केला आहे. तर नाॅर्वेजियन गव्हर्नमेंट पेंन्शन फंड ग्लोबलकडून नाॅर्जेस बँकेने स्माॅल फायनान्स बँकेचे अंदाजे ८७,७ लाख शेअर्स म्हणजे ०.७८ टक्का हिस्सा खरेदी केला आहे. एक्सेंजमध्ये उपलब्ध माहितीनुसार नाॅर्जेस बँकेने ही हिस्सेदारी ६७.९६ रुपये प्रती शेअर्स दराने खरेदी केली आहे. याचे एकत्रित मूल्य ९८ कोटी रुपये आहे.

म्युच्युअल फंडात बँकेत ३८.११ टक्के हिस्सेदारी

यादरम्यान एका दुसऱ्या परकीय गुंतवणूकदार इंटीग्रेटेड कोअर स्ट्रॅटेजीने (एशिया) इक्विटास स्माॅल फायनान्स बँकेचे ६६,३९ लाख शेअर्स विकले आहेत. डिसेंबरच्या तिमाहीत शेअर्स होल्डरच्या पॅटर्न्सनुसार, इक्विटास स्माॅल फायनान्स बँक पूर्णपणे पब्लिक शेअरहोल्डर्स ओन्ड बँक आहे. म्युच्युअल फंडांचा बँकेत ३८.११ टक्के हिस्सा आहे. तर परकीय गुंतवणूकदारांचा या बँकेत १८.६६ टक्के हिस्सा आहे.

तिसऱ्या तिमाहीत बँकेला १७० कोटींचा नफा

गव्हरमेंट आॅफ सिंगापूरच्या बँकेत या बँकेची १.६१ टक्के हिस्सेदारी आहे. तर सोसायटी जनरलची स्माॅल फायनान्स बँकेत १.१९ टक्के हिस्सेदारी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत इक्विटासचा नफा १७० कोटी रुपये होता. एका वर्षापूर्वीच्या समान कालावधीत तो १०८ कोटी रुपये होता.

विभाग