मराठी बातम्या  /  बिझनेस  /  gold mutual funds : सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देतात 'हे' तीन गोल्ड म्युच्युअल फंड

gold mutual funds : सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देतात 'हे' तीन गोल्ड म्युच्युअल फंड

Mar 15, 2023, 09:17 PM IST

  • Best gold mutual funds : म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे उत्तम साधन आहे, कारण त्यातून केवळ स्टाॅक्समध्येच नाही तर सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्येही गुंतवणूक करता येते आणि अधिकाधिक परतावा मिळू शकतो.

mutual funds HT

Best gold mutual funds : म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे उत्तम साधन आहे, कारण त्यातून केवळ स्टाॅक्समध्येच नाही तर सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्येही गुंतवणूक करता येते आणि अधिकाधिक परतावा मिळू शकतो.

  • Best gold mutual funds : म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे उत्तम साधन आहे, कारण त्यातून केवळ स्टाॅक्समध्येच नाही तर सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्येही गुंतवणूक करता येते आणि अधिकाधिक परतावा मिळू शकतो.

Best gold mutual funds : म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे असे साधन आहे, ज्याद्वारे तुम्ही केवळ शेअर्समध्येच नव्हे तर सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्येही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. अनेक म्युच्युअल फंड हाऊसमध्ये सोने आणि चांदीच्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा आहे, ज्यांची कामगिरी सामान्यतः देशांतर्गत बाजारातील सोन्या-चांदीच्या किमतींवर आधारित असते.अशाच काही टाॅप गोल्ड म्युच्युअल फंडांची माहिती पुढीलप्रमाणे

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

निप्पॉन इंडिया गोल्ड सेव्हिंग्स फंड

निप्पॉन इंडिया गोल्ड सेव्हिंग्स फंड हे ब्रोकरेजच्या शीर्ष निवडींपैकी एक आहे. गेल्या १ वर्षात ९.६७% वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक गेल्या १ वर्षात १,०९,६७० रुपये झाली. तर, १० हजार रुपये मासिक एसआयपीचे मूल्य आज १.३१ लाख रुपये झाले आहे. या योजनेत किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

एसबीआय गोल्ड फंड

SBI गोल्ड फंड ब्रोकरेजच्या टॉप पिकमध्ये समाविष्ट आहे. गेल्या १ वर्षात १०.७०% वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक गेल्या १ वर्षात १,१०,७०० रुपये झाली. तर, १० हजार रुपये मासिक एसआयपीचे मूल्य आज १.३१ लाख रुपये आहे. या योजनेत ५ हजार रुपये गुंतवले जाऊ शकतात. त्याच वेळी, तुम्ही या योजनेत किमान ५०० रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करू शकतात.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग्युलर गोल्ड सेव्हिंग्स फंड

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग्युलर गोल्ड सेव्हिंग्स फंड (एफओएफ) हे ब्रोकरेजच्या शीर्ष निवडींपैकी एक आहे. गेल्या १ वर्षात ९.१२% वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक गेल्या १ वर्षात १,०९,१२० रुपये झाली. तर, १० हजार रुपयांची मासिक एसआयपीचे मूल्य आज १.३० लाख रुपये आहे. या योजनेत १०० रुपये गुंतवले जाऊ शकतात.

एफडीपेक्षा जास्त परतावा

तीनही ब्रोकरेज फंडांचा परतावा १० : ७० टक्क्यांपर्यंत आहे. बँकेच्या एका वर्षाच्या एफडीशी तुलना केली, तर या गोल्ड फंडांमध्ये गुंतवणूक जास्त झाली आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या १ वर्षाच्या मुदत ठेवीवर नियमित ग्राहकाला ६.८० टक्के व्याज मिळत आहे.

विभाग

पुढील बातम्या