मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Small Cap Mutual funds : जबरदस्त फंड स्कीम, ३ वर्षांत पैसेही झाले तिप्पट

Small Cap Mutual funds : जबरदस्त फंड स्कीम, ३ वर्षांत पैसेही झाले तिप्पट

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 05, 2023 02:25 PM IST

Small Cap Mutual funds : गेल्या तीन वर्षांत चांगला परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडांबद्दलची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Mutual funds HT
Mutual funds HT

Small Cap Mutual funds : कोणताही म्युच्युअल फंड चांगला अथवा खराब प्रदर्शन करु शकतो. कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या निश्चित परताव्याचे भाकित करता येत नाही. याचा अर्थ असा नाही, कोणत्याही म्युच्युअल फंडात डोळे झाकून गुंतवणूक करावी. योग्य म्चुच्युअल फंडाची निवड करुन त्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. गेल्या तीन वर्षांत चांगला परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडांची माहिती पुढील प्रमाणे -

क्वांट स्माॅल कॅप फंड

क्वांट स्मॉल कॅप फंडाने ३ वर्षात ५२% वार्षिक परतावा देऊन २५४ % परतावा दिला आहे. इतक्या परताव्यासह, गुंतवणूकदारांचे पैसे ३.५ पेक्षा जास्त पटीने वाढले असतील. एवढा परतावा कोणाच्याही अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतो. परंतु योजनेच्या नावावरूनच, फंड ही स्मॉल कॅप योजना आहे आणि त्यात स्मॉल कॅप स्टॉक्सचा बहुसंख्य एक्सपोजर आहे. तथापि, हे फंड अस्थिर असू शकतात, कारण स्मॉल कॅप समभागांमध्ये अस्थिरता खूप जास्त असते. त्यामुळे या फंडांचा परतावाही कमी-अधिक असू शकतो.

या शेअर्सवर फोकस

क्वांट स्मॉल कॅप फंडाने गुंतवणूक केलेल्या काही समभागांमध्ये आयटीसी , आयआरबी इन्फ्रा, जिंदाल स्टेनलेस स्टील आणि आरबीएल बँक यांचा समावेश आहे. यापैकी काही समभाग जसे की आयटीसीने गेल्या काही वर्षांमध्ये असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे क्वांट स्मॉल कॅप फंडाच्या निव्वळ मालमत्ता मूल्यात भर पडली आहे.

परताव्याच्या अंदाज लावणे कठीण

ज्या फंडांनी गेल्या वर्षी चांगला परतावा दिला आहे, तोच परतावा यावर्षीही कायम राहिल असा अंदाज बांधणे चूकीचे ठरेल. क्वांट म्युच्युअल फंडासाठी गेल्या तीन वर्षांतील परतावा कायम राखणे कठीण काम होऊ शकते. म्हणूनच या फंडात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेले गुंतवणूकदार एसआयपीद्वारे पैसे गुंतवू शकतात. किंबहुना अशावेळी तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला मार्गदर्शक ठरतो. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

फंडाचा आकार ३१४१ कोटी रुपये आहे, जो स्मॉल कॅप फंडासाठी चांगला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेटिंग एजन्सी क्रिसीलने या फंडाला ५ स्टार रेटिंग दिले आहे, या फंडाची इक्विटी होल्डिंग सुमारे ९५ टक्के आहे. म्हणजेच ९५ टक्के रक्कम इक्विटी शेअर्समध्ये गुंतवली जाते. उर्वरित रोख आणि रोख समतुल्य मध्ये पार्क आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग