मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : आज बँक स्टाॅक्समध्ये घसरण, हे स्टाॅक्स खरेदी करा, ठरतील तुमच्यासाठी मल्टिबॅगर्स

Stocks to buy : आज बँक स्टाॅक्समध्ये घसरण, हे स्टाॅक्स खरेदी करा, ठरतील तुमच्यासाठी मल्टिबॅगर्स

May 22, 2023, 10:21 AM IST

    • Stocks to buy : करूर वैश्य बँकेचा स्टॉक १९ मे २०२२ रोजी ४५.०५ रुपयांवर ट्रेडिंग होताना दिसला. एका वर्षानंतर म्हणजेच १९ मे २०२३ रोजी हा स्टॉक रु १०५.१ वर ट्रेड करत होता.
bank stocks HT

Stocks to buy : करूर वैश्य बँकेचा स्टॉक १९ मे २०२२ रोजी ४५.०५ रुपयांवर ट्रेडिंग होताना दिसला. एका वर्षानंतर म्हणजेच १९ मे २०२३ रोजी हा स्टॉक रु १०५.१ वर ट्रेड करत होता.

    • Stocks to buy : करूर वैश्य बँकेचा स्टॉक १९ मे २०२२ रोजी ४५.०५ रुपयांवर ट्रेडिंग होताना दिसला. एका वर्षानंतर म्हणजेच १९ मे २०२३ रोजी हा स्टॉक रु १०५.१ वर ट्रेड करत होता.

Stocks to buy : बँकिंग क्षेत्राशी संबंधित असे आठ शेअर्स बाजारात आहेत, ज्यांनी खराब कामगिरी नोंदवत गेल्या वर्षी त्यांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तथापि, हे सर्व शेअर्स खराब कामगिरीनंतर परतले आहेत. त्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना १००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. लक्षात ठेवा की या ८ बँकांमध्ये खाजगी आणि पीएसयू बँकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

युको बँक

यादीतील पहिली बँक यूको बँक आहे. या बँकेच्या शेअरने २० जून २०२२ रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी १०.५५ रुपयांच्या पातळीला स्पर्श केला. १९ मे २०२३ रोजी या बँकेचा स्टॉक २६.५५ रुपयांवर व्यवहार करत आहे. अशा प्रकारे, एका वर्षात स्टॉकमध्ये सुमारे १५२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

करूर वैश्य बँक

करूर वैश्य बँक स्टॉकने गेल्या एका वर्षात १५० टक्के परतावा दिला आहे. १९ मे २०२२ रोजी या बँकेचा शेअर ४२.०५ रुपयांवर व्यवहार करत होता. बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच १९ मे २०२३ रोजी हा स्टॉक १०५.१ रुपयांवर व्यापार करत आहे.

पंजाब आणि सिंध बँक

पंजाब आणि सिंध बँकेचा स्टॉकची किंमत २१ जून २०२२ रोजी १३ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. आता एका वर्षानंतर १९ मे २०२३ रोजी या बँकेचा शेअर ३१.२५रुपयांवर व्यवहार करत होता. अशा प्रकारे, एका वर्षात १४०% वाढ दिसून आली आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक

२२ जून २०२२ रोजी आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरची किंमत २८.९५ रुपये या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होती. तिथून स्टॉकने तेजी दर्शविली आहे आणि सुमारे १ वर्षानंतर आपल्या गुंतवणूकदारांना १३१ टक्के परतावा दिला आहे. १९ मे २०२३ रोजी स्टॉक ६६.९ रुपयांवर ट्रेडिंग करत होता.

बँक ऑफ महाराष्ट्र

२० जून २०२२ रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचा स्टॉक सुमारे १५ रुपयांवर व्यापार करत होता. १९ मे २०२३ रोजी स्टॉक ३१.२ रुपयांवर ट्रेडिंग करत होता. अशा प्रकारे, या समभागाने १ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना १०८ % परतावा दिला आहे.

विभाग