मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  state bank : नोटा बदलण्यासाठी स्टेट बँकेची नियमावली जाहीर; नोटा बदलण्यासाठी अर्ज, ओळखपत्र गरजेचे नाही

state bank : नोटा बदलण्यासाठी स्टेट बँकेची नियमावली जाहीर; नोटा बदलण्यासाठी अर्ज, ओळखपत्र गरजेचे नाही

May 22, 2023, 08:31 AM IST

    • state bank news : केंद्रसरकारने दुसरी नोटबंदी जाहीर केली असून यात दोन हजरांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. या नोटा बदलण्यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने नियमावली जाहीर केली आहे.
₹2000 Currency Note Exchange Process (PTI)

state bank news : केंद्रसरकारने दुसरी नोटबंदी जाहीर केली असून यात दोन हजरांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. या नोटा बदलण्यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने नियमावली जाहीर केली आहे.

    • state bank news : केंद्रसरकारने दुसरी नोटबंदी जाहीर केली असून यात दोन हजरांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. या नोटा बदलण्यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने नियमावली जाहीर केली आहे.

state bank 2000 Currency Note Exchange Process : केंद्र सरकारने पुन्हा नोटबंदी जाहीर केली असून चालनातील सर्वांत मोठी नोट असलेली २ हजार रुपयांची नोट चलनातून बाहेर करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही नोट बदलून घेतली जाणार आहे. दरम्यान, ही नोट बदलून घेण्यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने नियमावली जाहीर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai, Pune weather update : मुंबईत उष्णतेच्या लाटेने तर उन आणि पावसाने पुणेकर झाले हैराण!

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

मोदी सरकारने या पूर्वी नोटबंदी जाहीर करून १ हजार रुपये आणि जुनी ५०० रुपयांची नोट चालनातून बाद केली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले होते. अनेक छोट्या उद्योगांना या निर्णयाचा फटका बसला होता. या नोटबंदीतून आता सावरत असतांना आता केंद्र सरकारने पुन्हा दुसरी नोटबंदी जाहीर करत २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद केली आहे. ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. २३ मेपासून ही नोट बदलून घेता येतील, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. मात्र, असे असतांनाही ही नोट बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी झाली होती.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ही नॉट बादलयासंदर्भात नियमावली जाहीर केली असून ही नोट बदलण्यासाठी कोणताही अर्ज भरून घेतला जाणार नाही तसेच नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांना ओळखपत्रही दाखवावे लागणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे. दोन हजारांची नोट बदलून घेण्यासाठी बँका अर्ज भरून घेणार असल्याचा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

त्यामुळे स्टेट बँकेने नोटा बदलण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. असा कोणताही अर्ज स्टेट बँक लिहून घेणार नल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. स्टेट बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक एस. मुरलीधरन म्हणाले की, बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये येऊन नागरिक नोटा बदलून घेऊ शकतात. त्यासाठी एका वेळी २० हजार रुपयांची मर्यादा आहे. नागरिकांकडून बँक कोणताही अर्ज लिहून घेणार नाही. त्याबरोबरच नोटा बदलताना संबंधित नागरिकाच्या ओळखीचा कोणताही पुरावा मागितला जाणार नाही.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या