मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Brij Bhushan Sharan Singh : ब्रिजभूषण सिंग नार्को, पॉलीग्राफी चाचणीस तयार, पण घातली ‘ही’ अट

Brij Bhushan Sharan Singh : ब्रिजभूषण सिंग नार्को, पॉलीग्राफी चाचणीस तयार, पण घातली ‘ही’ अट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 22, 2023 07:40 AM IST

Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाप्रकरणी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी नार्को आणि पॉलीग्राफी चाचणी घेण्यास होकार दिला आहे. स्वत: ब्रिजभूषण सिंह यांनी फेसबुक पोस्ट लिहून या बाबत माहिती दिली आहे.

Brij Bhushan Sharan Singh Uttar Pradesh
Brij Bhushan Sharan Singh Uttar Pradesh (HT_PRINT)

दिल्ली : महिला कुस्तीपटूंवर लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी नार्को आणि पॉलीग्राफी चाचणी घेण्यास होकार दिला आहे. स्वत: ब्रिजभूषण सिंह यांनी फेसबुक पोस्ट लिहून या बाबत माहिती दिली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी एक अटही ठेवली आहे. विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी माझ्यासोबत या सर्व चाचण्या कराव्यात या अटीवर मी या सर्व चाचण्या करून घेईन, अशी अट ब्रिजभूषण सिंह यांनी या लिहिलेल्या पोस्टमध्ये ठेवली आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू जंतरमंतर या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून निदर्शने करत आहेत. याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आली आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिले ?

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी रविवारी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, मी माझी नार्को चाचणी, पॉलीग्राफी चाचणी किंवा लाय डिटेक्टर चाचणी करण्यासाठी तयार आहे. पण माझ्यासोबत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनीही ही चाचणी करावी, अशी माझी अट आहे. जर दोन्ही कुस्तीपटू ही चाचणी माझ्यासोबत करण्यास तयार असतील तर मी देखील ही चाचणी करण्यास तयार आहे. मी माझ्या शब्दावर ठाम आहे असे लिहीत रामचरित मानस, रघुकुल रेती सदा चली आयी या ओळीने त्यांनी त्यांची पोस्ट संपवली.

जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच धरणे

या वर्षी जानेवारी महिन्यात पहिल्यांदा ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर विनेश फोगटने म्हटले होते की, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला. याशिवाय प्रशिक्षकांकडून त्रास होत असल्याबद्दलही तक्रार करण्यात आली होती. त्याच्या या आरोपांना इतर अनेक पैलवानांनीही पाठिंबा दिला होता. या प्रकरणी बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांच्यासह अनेक खेळाडू जंतरमंतरवर धरणे धरले. त्यानंतर तपासाचे आश्वासन मिळाल्याने पैलवानांनी आंदोलन मागे घेतले. नंतर एप्रिलमध्ये कुस्तीपटू ब्रिजभूषण पुन्हा सिंग यांच्याविरोधात पुन्हा सर्व पैलवान हे संपावर बसले. त्यांच्या मागण्या ऐकल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली.

खाप पंचायतीने घेतला हा निर्णय

दुसरीकडे, खाप महापंचायतीने रविवारी निर्णय घेतला की भारतीय कुकरी फेडरेशनचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधाला पाठिंबा देणाऱ्या महिला २८ मे रोजी नवीन संसद भवनासमोर पंचायत घेणार आहेत. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. खाप पंचायतीच्या नेत्यांनी रोहतकमध्ये एका दिवशी बैठक घेतली, ज्यामध्ये काही मोठा निर्णय अपेक्षित होता, पण शेवटी त्यांनी संसद भवनाकडे मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला. आंदोलक कुस्तीपटूंपैकी साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत काद्यान यांनी महापंचायतीला हजेरी लावली, तर बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे जंतर-मंतरवर सुरू असलेल्या धरणे येथे उपस्थित राहिले.

IPL_Entry_Point

विभाग