मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हृदयद्रावक.. वाढदिवसाआधीच १६ वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेहासोबत कुटूंबाने कापला केक

हृदयद्रावक.. वाढदिवसाआधीच १६ वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेहासोबत कुटूंबाने कापला केक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 21, 2023 11:36 PM IST

16yearoldboydied due to heartattack : वाढदिवसाच्या एक दिवस आधीच १६ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

वाढदिवसाआधीच १६ वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू
वाढदिवसाआधीच १६ वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

तेलंगाणा राज्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एक कुटूंब आपल्या १६ वर्षीय मुलाचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत गुंतला होता. मात्र वाढदिवसाच्या एक दिवस आधी तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटूंबाने मुलाच्या मृतदेहासोबत केक कापून बर्थडे साजरा केला आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

ट्रेंडिंग न्यूज

कोमाराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील बाबापूरमधील गुणवंत राव आणि ललिता या दाम्पत्याला तीन मुले आहेत. शुक्रवारी तिसरा मुलगा सचिन (वय १६) याचा वाढदिवस होता. सचिनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटूंबाने तयारी सुरू केली होती. वाढदिवसासाठी सचिन आसिफाबाद येथे खरेदी करण्यासाठी गेला होता. 

खरेदी करतानाच त्याच्या छातीत दुखू लागले. तब्येत बिघडल्याने त्याने याची माहिती ई-वडिलांना दिली. त्यानंतर तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे  प्राथमिक  उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी त्याला मनचेरियल रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या कुटूंबाने निर्णय घेतला की, मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेहासोबत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आई-वडिलांनी त्याचा हात पकडून केक कापला. तसेच सर्वांनी साश्रूपूर्ण नयनांनी व थरथरत्या ओठांनी हॅप्पी बर्थ डे टू यू सचिन म्हटले. त्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग