मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : तब्बल १८ वर्षांनंतर येतोय टाटाच्या या कंपनीचा आयपीओ; कमाईची मोठी संधी

IPO News : तब्बल १८ वर्षांनंतर येतोय टाटाच्या या कंपनीचा आयपीओ; कमाईची मोठी संधी

May 03, 2023, 05:25 PM IST

  • Tata Play IPO : देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या ‘टाटा’च्या आणखी एका कंपनीनं आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे.

Tata Group (REUTERS)

Tata Play IPO : देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या ‘टाटा’च्या आणखी एका कंपनीनं आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे.

  • Tata Play IPO : देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या ‘टाटा’च्या आणखी एका कंपनीनं आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे.

Tata Play IPO : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आणि कमाईचे अनेक मार्ग असतात. त्यापैकी एक म्हणजे आयपीओ. अनेक कंपन्या व्यवसायवृद्धीसाठी आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात उतरून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी योग्य कंपनीचे शेअर्स घेऊन गुंतवणुकीची व कमाईची उत्तम संधी असते. अशीच एक संधी चालून आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

Flipkart Sale: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा; स्मार्टफोन, टीव्हीसह 'या' वस्तूंवर मिळणार तगडं डिस्काऊंट

Bank Holiday may 2024 : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी

Realme Sale: उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी; अवघ्या १०,९९९ रुपयांत खरेदी करा रिअलमीचा 'हा' फोन!

अनेक वर्षांनंतर टाटा समूहतील एका कंपनीचा IPO येत आहे. 'टाटा प्ले' असं या कंपनीचं नाव आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) नं टाटा प्लेच्या आयपीओला ग्रीन सिग्नल दिला आहे. आयपीओसाठी बाजार नियामकाकडं गोपनीय कागदपत्रे दाखल करणारी टाटा समूहाची कंपनी ही भारतातील पहिली कंपनी आहे.

RBI bonds : ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज! आरबीआयच्या 'या' योजनेपुढं बँक एफडी फेल

१८ वर्षांनी येतोय आयपीओ

टाटा प्ले ही १८ वर्षांनंतर IPO लाँच करणारी समूहातील बहुधा पहिलीच कंपनी आहे. बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी IPO च्या माध्यमातून सुमारे ३ हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. यात नव्या आणि सेकंडरी शेअर विक्रीचं मिश्रण असू शकतं. टाटा प्लेला आता IPO लाँच करण्यापूर्वी अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP-1) दाखल करावा लागेल.

कंपनी नेमकं करते काय?

टाटा प्ले ही कंपनी MPEG-4 डिजिटल कॉम्प्रेशन तंत्रज्ञानाच्या आधारे INSAT-4A आणि GSAT-10 च्या माध्यमातून भारतात सॅटेलाइट टेलिव्हिजन सेवा पुरवते. सन २००५ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सध्या ६०१ चॅनेल, ४९५ एसडी चॅनेल आणि ९९ एचडी चॅनेल आणि अन्य सेवा देते. ट्रायच्या २०२० च्या आकडेवारीनुसार, टाटा प्लेचे देशभरात सध्या सुमारे २ कोटी २० लाख ग्राहक आहेत.

Multibagger Stock: लाखाचे झाले अडीच कोटी! 'या' शेअरनं भरली गुंतवणूकदारांची झोळी

टाटा टेक्नॉलॉजीजचाही आयपीओ

टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजनंही आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे. मार्च महिन्यात कंपनीनं सेबीकडं ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. कंपनीला लवकरच सेबीकडून मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओच्या माध्यमातून सुमारे ४ हजार कोटी रुपये उभारणार असल्याचं समजतं.

विभाग