मराठी बातम्या  /  बिझनेस  /  RBI bonds : ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज! आरबीआयच्या 'या' योजनेपुढं बँक एफडी फेल

RBI bonds : ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज! आरबीआयच्या 'या' योजनेपुढं बँक एफडी फेल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 01, 2023 05:28 PM IST

rbi floating rate savings bonds 2022 : चांगल्या परताव्यासाठी एफडीला पर्याय शोधत असाल तर आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

bonds
bonds

Best FD Rates in India 2023 : शेअर्स, म्युच्युअल फंडाचा जमाना असला तरी आजही अनेक जण सुरक्षित आणि निश्चित परताव्यासाठी पहिलं प्राधान्य मुदत ठेवींनाच (Bank FD) देतात. मात्र, केवळ बँक एफडी हीच निश्चित परतावा देणारी गुंतवणूक नाही. त्याशिवाय, देखील काही पर्याय आहेत. आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्स २०२२ हा असाच एक पर्याय आहे. या बाँड्सवरील व्याजदर फिक्स्ड नसले तरी एफडीपेक्षाही अधिक परतावा देतात.

आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड योजनेच्या नावातच 'फ्लोटिंग' हा शब्द आहे. त्यामुळं या योजनेतून मिळणारा व्याजदर स्थिर नसतो. या योजनेचे व्याजदर वेळोवेळी बदलत राहतात. मात्र, या योजनेतून गुंतवणूकदारांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) पेक्षा ०.३५ टक्के जास्त व्याज मिळत आहे. सध्या RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स २०२२ वर ७.३५ टक्के व्याज मिळतेय. येत्या १ जुलै रोजी हा दर ८.०५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड २०२२ चे व्याजदर दर ६ महिन्यांनी बदलतात. व्याजदर बदलण्याची अंतिम तारीख १ जुलै २०२३ आहे.

Multibagger Stock: लाखाचे झाले अडीच कोटी! 'या' शेअरनं भरली गुंतवणूकदारांची झोळी

कसा ठरतो या योजनेचा व्याजदर?

अन्य रोख्यांप्रमाणे आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँडचे व्याज दरही निश्चित नाहीत. मात्र, हे व्याजदर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राशी जोडलेले आहेत. NSC चे व्याजदर वाढले तर आरबीआय बॉन्डच्या व्याज दरातही वाढ होते. NSC चे व्याजदर कमी झाले तर फ्लोटिंग रेटचे सेव्हिंग्ज बाँडचे व्याजदर देखील खाली येतात.

एप्रिल ते जून २०२३ या कालावधीसाठी केंद्र सरकारनं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा व्याजदर ७.७ टक्के केला आहे. त्यामुळं १ जुलैपासून आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स २०२२ वर ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळण्याची शक्यता आहे.

PNB बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! एटीएममधून पैसे काढायला जात असाल तर हे वाचा

बँक एफडीवर सध्या किती व्याज?

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही सध्या सर्वसाधारण नागरिकांना एफडीवर जास्तीत जास्त ७.१० टक्के व्याज देते. तर, ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.६० टक्क्यांपर्यंत व्याज देते. तर, अॅक्सिस बँक ७.२० टक्के, एचडीएफसी बँक ७.१० टक्के, आयसीआयसी बँक ७.१० टक्के व्याज देते. या दराशी तुलना करता आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स निश्चितच अधिक फायदेशीर ठरू शकतात.

WhatsApp channel

विभाग