मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PNB बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! एटीएममधून पैसे काढायला जात असाल तर हे वाचा

PNB बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! एटीएममधून पैसे काढायला जात असाल तर हे वाचा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 01, 2023 03:39 PM IST

PNB ATM Charge : पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.

ATM
ATM

PNB ATM Charge : पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएनबी बँकेनं १ मे पासून नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार, आता एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसताना एटीएम मशीनमधून पैसे काढायचे असतील तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. शुल्काची रक्कम १० रुपये अधिक जीएसटी एवढी ​​असेल. बँकेनं या शुल्काची माहिती ग्राहकांना आधीच दिली होती. बँक खात्यावर पुरेसा बॅलन्स नसल्यास १ मे २०२३ पासून ATM मधून रोख रक्कम काढताना शुल्क लागेल, असा संदेश ग्राहकांना पाठवण्यात आला होता. त्यामुळं एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी शिल्लक तपासून घ्या, अन्यथा तुम्हाला शुल्क भरावं लागेल.

Multibagger Stock: लाखाचे झाले अडीच कोटी! 'या' शेअरनं भरली गुंतवणूकदारांची झोळी

डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड देण्यासाठी आकारले जाणारे शुल्क आणि वार्षिक देखभाल शुल्कातील बदलाबद्दलही पीएनबी बँकेनं काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. डेबिट कार्डद्वारे केलेल्या PoS आणि ई-कॉमर्स व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. अर्थात, हे शुल्क ग्राहकाच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसेल आणि त्यामुळं व्यवहार पूर्ण झाला नाही तरच लागणार आहे.

सोप्या भाषेत समजावून सांगायचं झाल्यास, समजा तुम्ही Amazon सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून एखादी वस्तू खरेदी केली आणि PoS किंवा डेबिट कार्डनं पैसे दिले, परंतु खात्यावर पुरेसे पैसे शिल्लक नसल्यानं व्यवहार अयशस्वी झाला, तर बँक दंड आकारू शकते.

Employment fraud: स्वयंरोजगाराच्या नावाखाली तब्बल ४० हजार तरुणांची फसवणूक, नऊ कोटी उकळले!

या गोष्टी लक्षात ठेवा

  • एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास त्याची तक्रार ७ दिवसांच्या आत करा.
  • तुमच्या तक्रारीवर ३० दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास बँकेकडून दिवसाला १०० रुपये भरपाई दिली जाईल.
  • काही समस्या किंवा तक्रार असल्यास, तुम्ही ग्राहक सेवा क्रमांक ०१२०-२४९०००० किंवा १८००१८०२२२२, १८०० १०३ २२२२ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

WhatsApp channel

विभाग