मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Employment fraud: स्वयंरोजगाराच्या नावाखाली तब्बल ४० हजार तरुणांची फसवणूक, नऊ कोटी उकळले!

Employment fraud: स्वयंरोजगाराच्या नावाखाली तब्बल ४० हजार तरुणांची फसवणूक, नऊ कोटी उकळले!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 01, 2023 10:57 AM IST

Job 2023: स्वयंरोजगाराच्या नावाखाली ४० हजार तरुणांची फसवणूक केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Cyber Frauds
Cyber Frauds

Sanjay Sherpuria: एसटीएफच्या तपासात संजय शेरपुरियाबाबत मोठा खुलासा झाला आहे. शेरपुरिया यांनी स्वयंरोजगाराच्या नावाखाली एनजीओच्या माध्यमातून सुमारे ४० हजार तरुणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यातील तरुण संजय शेरपुरियाच्या जाळ्यात अडकले. या बेरोजगार तरुणांना एनजीओच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले गेले, त्याचे पुरावे एसटीएफने जमा केले. याप्रकरणी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एसटीएफने संजय शेरपुरियाला मंगळवारी अटक केली. त्यानंतर बुधवारी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी विभूतीखंड पोलीस तपास करत आहेत. तसेच एसटीएफने आपल्या पद्धतीने आणखी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.

शेरपुरिया यांनी युथ रूरल इंटरप्रन्योर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वयंरोजगार योजनेशी संबंधित एक मोहीम सुरू केली. यासाठी तरुणांकडून नोंदणीच्या नावावर दोन हजार २०० रुपये घेण्यात आले. ही सर्व रक्कम फाउंडेशनच्या खात्यात जमा करण्यात आली. एसटीएफच्या तपासात ही बाब उघड झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ४० हजार तरुणांनी नोंदणी केली. म्हणजेच शेरपुरियाने सुमारे नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती उघडकीस आली. या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयचे सर्व एजंट एनजीओसाठी काम करतात. स्वयंरोजगाराच्या नावाखाली त्यांनी अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात अडकववले. तरुणांना स्वयंसेवी संस्थेशी जोडून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असा दावा केला जात होता. या जाळ्यात अडकलेल्या लोकांकडून एजंट पैसे गोळा करून स्वत:च्या खात्यातून एनजीओच्या खात्यात जमा करायचे, याचे भक्कम पुरावेही सापडले आहेत.

तपास यंत्रणेने संजय शेरपुरियाशी संबंधित कंपन्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे २४ कंपन्यांच्या बँक खात्यांचे तपशील गोळा करण्यात आले आहेत. काही कंपनीत एक कोटी आणि काहींमध्ये ५० लाख तर काहींमध्ये दोन कोटी रुपये होते. ही सर्व खाती गोठवली जात आहेत. आणखी बऱ्याच कंपन्यांचे तपशील मिळणे बाकी आहे. या कंपन्यांची अधिक माहिती तपास यंत्रणेने संबंधित विभागाकडे मागवली आहे.

संजय शेरपुरिया यांच्या पत्नीनेही कंपन्यांमध्ये पदे भूषवली आहेत. एसबीआयने या दोघांनाही बँक डिफॉल्टर म्हणून घोषित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा त्यांचीही चौकशी करत आहे. सर्व कागदपत्रांमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे. आता या खोट्या प्रकरणात संजयच्या पत्नीचा हात आहे की नाही? याचा शोध तपास यंत्रणा करणार आहे.

WhatsApp channel

विभाग