मराठी बातम्या  /  बिझनेस  /  bisleri Tata deal : बिस्लेरी तहानलेलीच !उत्तराधिकारी नाहीच पण टाटासोबत करारही अडकला

bisleri Tata deal : बिस्लेरी तहानलेलीच !उत्तराधिकारी नाहीच पण टाटासोबत करारही अडकला

Mar 01, 2023, 06:21 PM IST

    • bisleri Tata deal : उत्तराधिकारी नाही म्हणून व्यावसायिक रमेश चौहान यांनी बिसलेरी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला.  मात्र आता टाटा समूहासोबतही हा करार अडकला आहे. नेमकं कारण काय आहे यामागचं जाणून घ्या -
bisleri Tata deal HT

bisleri Tata deal : उत्तराधिकारी नाही म्हणून व्यावसायिक रमेश चौहान यांनी बिसलेरी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला. मात्र आता टाटा समूहासोबतही हा करार अडकला आहे. नेमकं कारण काय आहे यामागचं जाणून घ्या -

    • bisleri Tata deal : उत्तराधिकारी नाही म्हणून व्यावसायिक रमेश चौहान यांनी बिसलेरी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला.  मात्र आता टाटा समूहासोबतही हा करार अडकला आहे. नेमकं कारण काय आहे यामागचं जाणून घ्या -

Bisleri Tata deal : टाटा कंझ्युमर आणि बिसलेरी यांच्यातील कराराची चर्चा रखडली आहे. याचे प्रमुख कारण मूल्यांकन सांगितले जात आहे. बिसलेरीच्या मालकांना या करारातून सुमारे  १ अब्ज अमेरिकन डाॅलर्स उभे करायचे होते. बिसलेरी ही भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर कंपनी आहे.   बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांनी १९६९मध्ये सुमारे ४ लाख रुपयांना ही कंपनी विकत घेतले. ब्लूमबर्गने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बातमी पसरली की बिसलेरी कंपनीतील  थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का हे शीतपेय ब्रँड कोका-कोलाला विकल्यानंतर सुमारे तीन दशकांनंतर रमेश चौहान बिसलेरी इंटरनॅशनलला विकत आहेत. ८२ वर्षीय चौहान यांना एकूलती एक मुलगी आहे. तिला बिसलेरीच्या व्यवसायात रस नाही. त्यामुळे बिसलेरीला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी उत्तराधिकारी नाही, असे सांगून त्यांनी ही कंपनी विक्रीला काढली. या कंपनीत टाटा समूहातील टाटा कन्झ्यूमरने रस दाखवला आहे. मात्र बिस्लेरी कंपनीच्या मूल्यांकनासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने या दोन्ही कंपन्यांमधील करार रखडला आहे. 

बिसलेरी आणि टाटा कन्झ्यूमर यांच्यात मूल्यांकनाबाबतची बाब स्पष्ट झालेली नाही.  या दोन्ही कंपन्यांमध्ये बिसलेरी कंपनीच्या एकूण मूल्यांकनावर एकमत झालेले नाही. अशा स्थितीत करार अजूनही रखडला आहे. बिसलेरी टाटाला स्टेक विकण्यासाठी बोलणी करत होती. बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी नोव्हेंबरमध्ये एका मुलाखतीत सांगितले. 

भारतात बिस्लेरीचा मोठा हिस्सा 

बिसलेरी १९४९ मध्ये आली. वेबसाइटनुसार, बिस्लेरी १९६९ मध्ये एका इटालियन उद्योजकाकडून विकत घेण्यात आली होती. बिसलेरी पाण्याच्या व्यवसायातील ६०  टक्के हिस्सा ते भारतात ठेवत आहेत. कंपनी हँड सॅनिटायझर देखील बनवते. त्याच वेळी, टाटा समूह हिमालयन नॅचरल मिनरल वॉटर आणि टाटा वॉटर प्लस ब्रँड्ससह पाण्याच्या व्यवसायात आहे. टाटा समूहाचा बिसलेरीशी करार झाला तर ती पाण्याच्या व्यवसायातील मोठी कंपनी ठरेल.

 

 

 

 

 

 

 

विभाग