मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jayati Chauhan : जिने बिसलेरीचा व्यवसाय सांभाळला तिनेच नाकारले !

Jayati Chauhan : जिने बिसलेरीचा व्यवसाय सांभाळला तिनेच नाकारले !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 27, 2022 04:34 PM IST

Jayati Chauhan : बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांनी त्यांची मुलगी जयंती चौहानच्या नकारामुळे व्यवसाय विक्रीचा निर्णय़ घेतला.

Jayanti Chauhan HT
Jayanti Chauhan HT

Jayati Chauhan :  उद्योगपती रमेश चौहान यांनी १९६९ मध्ये बिसलेरीचा ब्रॅड खरेदी केला होता. बिसलेरी इंटरनॅशनलचे १३३ आॅपरेशनल प्लान्ट्स आहेत.तर भारतासह विविध देशांमध्ये कंपनीने आपले स्थान बक्कळ केले आहे.

पांथस्थाला पॅक्ड प्युअर वाॅटरची जेंव्हा आठवण येते तेंव्हा आजही सहजच सर्वात पहिल्यांदा आपण ‘एक बिसलेरी द्या’ असंच म्हणतो. आज या क्षेत्रात विविध ब्रँड्स बाजारात आले आहेत. पण बिसलेरीने जनमानसाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

बिसलेरी ब्रॅड उद्योगपती रमेश चौहान यांनी एका व्यावसायिकाकडून खरेदी केला होता. या क्षेत्रात आपले स्थान बक्कळ केल्यानंतर, केवळ एकूलती एक लेक जयंती चौहानच्या नकारास्तव व्यवसाय विक्री करण्याची तयारी सुरु केली आहे. तो खरेदी करण्यासाठी टाटा कन्झ्युमर प्राॅडक्ट्स लिमिटेडसह अनेक कंपन्या स्पर्धेत आहेत.

जयंतीला बिसलेरीचा व्यवसाय पुढे नेण्यात इंट्रेस्ट नाही, चौहान यांनी सांगितले. वास्तविक जयंती चौहान हिने सुरुवातीच्या काळात बिसलेरीच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळली होती. असे असले तरीही तिला भावी जबाबदारी घेण्याची इच्छा नाही.

जयंती चौहानचा परिचय

बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांची एकूलती एक मुलगी जयंती उर्फ जेआरसी. तिने लंडन काॅलेज आँफ फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्रॅफीमध्ये शिक्षण घेतले आहे. तिने स्कूल आॅफ ओरियंटल अँड आफ्रिकन स्टडीज, लंदन विश्वविद्यालयातून अरबी भाषेतून पदवी संपादन केली आहे.

वयाच्या २४ व्या वर्षी तिने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बिसलेरीच्या व्यवसायात पदार्पण केले. तिने दिल्ली कार्यालय सांभाळले होते. त्यानंतर २०११ मध्ये मुंबई कार्यालयाचे व्यवस्थापन करायला सुरुवात केली. या दरम्यान जयती बिसलेरीच्या एचआर, सेल्स आणि मार्केटिंगसारख्या विभागांची पूर्नरचना केली होती.

बिसलेरीच्या अधिकाधिक वेबसाईटनुसार, जयंती चौहानने बिसलेरी मिनरल वाॅटर, वेदिक नॅच्युलर्स, मिनरल वाॅटर फ्राॅम द हिमालय, फ्रिजी फ्रूट ड्रिंक्स आणि बिसलेरी हॅड प्युरीफायर्सच्या कारभार सुव्यवस्थित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. जयंतीने विक्री आणि विपणन विभागाचे नेतृत्त्व केले आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग