मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : आज अदानी ग्रीन्स, कोल इंडिया, सेलसहित हे स्टाॅक्स खरेदी करा आणि व्हा कोट्यधीश ! पाहा चेक लिस्ट

Stocks to buy : आज अदानी ग्रीन्स, कोल इंडिया, सेलसहित हे स्टाॅक्स खरेदी करा आणि व्हा कोट्यधीश ! पाहा चेक लिस्ट

Jun 01, 2023, 09:34 AM IST

    • Stocks to buy : आज अदानी ग्रीन्स, कोल इंडियासह या स्टाॅक्सची चर्चा शेअर बाजारात होत आहेत. तुम्हीसुद्धा याचा फायदा उठवता येईल.
stocks to buy HT

Stocks to buy : आज अदानी ग्रीन्स, कोल इंडियासह या स्टाॅक्सची चर्चा शेअर बाजारात होत आहेत. तुम्हीसुद्धा याचा फायदा उठवता येईल.

    • Stocks to buy : आज अदानी ग्रीन्स, कोल इंडियासह या स्टाॅक्सची चर्चा शेअर बाजारात होत आहेत. तुम्हीसुद्धा याचा फायदा उठवता येईल.

Stocks to buy : जागतिक पातळीवर मिळालेल्या कमकूवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज सेन्सेक्सची सुरुवात सावध झाली आहे. त्याअनुषंगाने आज या स्टाॅक्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला शेअर तज्ज्ञांनी दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

साऊथ इंडियन बँक

दक्षिण भारतातील आघाडीची बँक साऊथ इंडियन बँकेने तिच्या एमडी आणि सीईओ पदासाठी उमेदवार निवडीसंदर्भात अंतिम रूप दिले आहे. दक्षिण भारतीय बँक आता आरबीआयकडे अर्ज सादर करणार आहे आणि त्यांच्या नियुक्तीसाठी मान्यता मिळवणार आहे.

कोल इंडिया

केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा खाण कंपनी कोल इंडियामधील ३ टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा कंपनी कोल इंडियामधील हा हिस्सा १ जून रोजी ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहे.

सेल

सरकारने अमरेंदू प्रकाश यांची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचा फायदा आज सेल कंपनीच्या स्टाॅक्सवर होताना दिसणार आहे.

एचडीएफसी लाईफ

एचडीएफसी लाइफचे प्रवर्तक अबर्डन यांनी बुधवारी मोठ्या प्रमाणात बल्क डिलच्या माध्यमातून आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. प्रमोटर म्हणून त्यांनी एचडीएफसी लाईफमधून माघार घेतली आहे.

अदानी ग्रीन

गौतम अदानी यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड एक प्रस्ताव मंजूर करणार आहे. यामध्ये पुढील काही आठवड्यात एक अब्ज डॉलर्सची रक्कम उभारली जाईल.

विभाग