मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Stocks : अदानींचे हे दोन स्टाॅक्स एमएससीआय ग्लोबल इंडेक्समधून बाहेर, शेअर्स गडगडले

Adani Stocks : अदानींचे हे दोन स्टाॅक्स एमएससीआय ग्लोबल इंडेक्समधून बाहेर, शेअर्स गडगडले

May 31, 2023, 03:40 PM IST

    • Adani Stocks : अदानी ट्रान्समिशन आज एनएसईवर ७८० रुपयांवर खुला झाला आणि ७७४ च्या निचांकी पातळीवर आले आहेत. सकाळी साडे १० वाजताच्या सुमारास त्यात ३ टक्क्यांची घट होऊन ७८०.०५ रुपयांवर ट्रेड करत होता. याचप्रमाणे अदानी टोटल गॅस ६७५ रुपयांवर खुला झाला.
adani HT

Adani Stocks : अदानी ट्रान्समिशन आज एनएसईवर ७८० रुपयांवर खुला झाला आणि ७७४ च्या निचांकी पातळीवर आले आहेत. सकाळी साडे १० वाजताच्या सुमारास त्यात ३ टक्क्यांची घट होऊन ७८०.०५ रुपयांवर ट्रेड करत होता. याचप्रमाणे अदानी टोटल गॅस ६७५ रुपयांवर खुला झाला.

    • Adani Stocks : अदानी ट्रान्समिशन आज एनएसईवर ७८० रुपयांवर खुला झाला आणि ७७४ च्या निचांकी पातळीवर आले आहेत. सकाळी साडे १० वाजताच्या सुमारास त्यात ३ टक्क्यांची घट होऊन ७८०.०५ रुपयांवर ट्रेड करत होता. याचप्रमाणे अदानी टोटल गॅस ६७५ रुपयांवर खुला झाला.

Adani Stocks : अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी टोटल गॅस लिमिटेडला बुधवारी एमएससीआय ग्लोबल सँन्डर्ड इंडेक्समधून आपल्या नवीन रीजिंग एक्सरसाईजमधून हटवल्यानंतर शेअर्सनी गटांगळी खाल्ली. इंडेक्समधून बाहेर पडलेले इंडस टाॅवरदेखील लाल रंगात होते. अदानी ट्रान्समिशन आणि एनएसईवर ७८० रुपयांवर उघडला आणि ७७४ रुपयांच्या निचांकी पातळीवर आला. याचप्रमाणे अदानी टोटल गॅसने ६७५ रुपयांवर सुरुवात केली आणि ६८१.८५ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवरुन घसरुन तो ६६७.२९ रुपयांवर आला. याचप्रमाणे इंडस टाॅवरने बीएसईवर १५४.१५ रुपयांवर ट्रेड करण्यास सुरुवात केली.

इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या तीन शेअर्समध्ये मॅक्स हेल्थकेअर इंस्टिट्यूट (०.९ टक्के वर ५४०.६५ रुपये), हिंदुस्तान एरोनाॅटिकल्स (०.७ टक्के वर ३१२५.०५ रुपये.) आणि सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग (५१२.०५ रुपयांवर) खुला झाला.

अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस सध्याच्या स्थितीत १८ दशलक्ष इक्विटी शेअर्ससह इंडेक्सवर अनुक्रमे ०.३१ टक्के आणि ०.२८ टक्के वेटेज ठेवतात. या दरम्यान इंडस टाॅवर्स ृला ८.४ कोटी डाॅलर्सचे नुकसान होईल.

नुवामाच्या रिपोर्टनुसार, अदानी ट्रान्समिशन इंडेक्समधून बाहेर पडेल. यामुळे तब्बल १८९ दशलक्ष डाॅलर्सचे आऊट फ्लो होईल. तर अदानी टोटल गॅसला यामुळे १६.७ कोटी डाॅलर्सचे नुकसान होईल. अदानींच्या दोन कंपन्यांना संयुक्त रुपात ३५६ दशलक्ष डाॅलर्सचे नुकसान होईल.

ब्रोकरेजने दिलेल्या माहितीनुसार, एमएससीआय इंडिया इंडेक्समध्ये मॅक्स हेल्थकेअर, सोना बीएलडब्ल्यू आणि एचएएल सारख्य्या शेअर्सनी महत्त्वपूर्ण परफाॅर्मन्स दिला आहे. या शेअर्सकडून अपेक्षा आहेत. कोटक बँक, ओएनजीसी, एचडीएफसीसारख्या दिग्गज स्टाॅक्सनी फारसा चांगला परफाॅर्मन्स दिलेला नाही.