मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex Nifty in Modi tenure : मोदींचा ९ वर्षांचा कार्यकाळ, सेन्सेक्स निफ्टीने दिले छप्परफाड रिटर्न्स

Sensex Nifty in Modi tenure : मोदींचा ९ वर्षांचा कार्यकाळ, सेन्सेक्स निफ्टीने दिले छप्परफाड रिटर्न्स

May 29, 2023, 06:03 PM IST

    • Sensex Nifty in Modi tenure :  मोदी सरकारचा कार्यकाळ शेअर बाजारासाठी सकारात्मक ठरला आहे. बाजारातील सर्वच सेक्टर्सनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. बाजार भांडवलातही या दरम्यान चांगलीच वाढ झाली आहे. 
sensex up HT

Sensex Nifty in Modi tenure : मोदी सरकारचा कार्यकाळ शेअर बाजारासाठी सकारात्मक ठरला आहे. बाजारातील सर्वच सेक्टर्सनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. बाजार भांडवलातही या दरम्यान चांगलीच वाढ झाली आहे.

    • Sensex Nifty in Modi tenure :  मोदी सरकारचा कार्यकाळ शेअर बाजारासाठी सकारात्मक ठरला आहे. बाजारातील सर्वच सेक्टर्सनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. बाजार भांडवलातही या दरम्यान चांगलीच वाढ झाली आहे. 

Sensex Nifty in Modi tenure : केंद्रात मोदी सरकारचा ९ वर्षांचा कार्यकाळ उद्या ३० मे रोजी पूर्ण होत आहे. या ९ वर्षांच्या कार्यकाळात रशिया युक्रेन युद्ध, कोरोना सारखी भयावह संकटांच्या मालिकेला या सरकारने नेटाने तोंड दिलयं. असं असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्थेची गती चांगली ठेवण्यात मोदी सरकाला यश आलं आहे. शेअर बाजारातही गुंतवणूकदारांना चांगला परतावा याच काळात मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

२०१४ पासून १५० टक्के परतावा

२०१४ पासून आतापर्यंत बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टीने जवळपास १५० टक्के परतावा दिला आहे, तर बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप या कालावधीत तिप्पटीने वाढून १९५ लाख कोटी रुपये झाले आहे.

२०१४ मध्ये सेन्सेक्स निफ्टी

२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. यावेळी सेन्सेक्स २४,७१६.८८ आणि निफ्टी ७,३५९.०५ च्या अंशपातळीवर होता. मात्र आज सेन्सेक्स ६२,००० च्या अंश पातळीजवळ आहे, तर निफ्टी १८,५००अशांच्या आसपास आहे. २६ मे २०१४ रोजी सर्व बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ८५,२०,८१६.६३ कोटी रुपये होते, यात वाढ झाली आहे. आज २९ मे २०२३ रोजी सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप हे अंदाजे २,८०,३३,३७३.६३ कोटी रुपये होते.

इतर इंडेक्सने दिलेला परतावा

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सर्वच क्षेत्रांनी जोरदार परतावा दिला आहे. निफ्टी आयटी २१९ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस २१३ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँक १९६ टक्के, निफ्टी बँक १८८ टक्के, निफ्टी एफएमजीसी इंडेक्स १८० टक्क्यांनी वाढले आहेत. निफ्टी एनर्जी इंडेक्सने १४०%, निफ्टी ऑटो इंडेक्स ११६%, निफ्टी रियल्टी ९४%, निफ्टी मेटल ८६% आणि निफ्टी फार्मा ६७% परतावा दिला आहे.

अर्थव्यवस्थाही रुळावर

मोदी सरकारने गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेच्या विकासासंदर्भात अनेक धोऱणात्मक बदल केले आहेत. सध्याच्या स्थितीत अर्थव्यवस्था ६ ते ७ टक्के दराने वाढत आहे. सध्याच्या स्थितीत जगाच्या पटलावर वेगाने वाढणाऱी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेच्या वेगाच्या स्थितीकडे पाहता आगामी काळात जर्मनी आणि जपानला पाठी टाकत तिसऱ्या क्रमांकावर भारतीय अर्थव्यवस्था पोहोचेल असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

विभाग