मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stocks : अबब! ३,००,००० टक्के रिटर्न्स, कूलर बनवणाऱ्या कंपनीचा शेअर ठरला 'हाॅट', १ लाखाचे केले ३० कोटी रुपये

Multibagger stocks : अबब! ३,००,००० टक्के रिटर्न्स, कूलर बनवणाऱ्या कंपनीचा शेअर ठरला 'हाॅट', १ लाखाचे केले ३० कोटी रुपये

May 29, 2023, 12:49 PM IST

    • Multibagger stocks : या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ३ लाख टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स या कालावधीत २८ पैशांनी वाढून ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२१८.९५ रुपये आहे.
multibagger stocks HT

Multibagger stocks : या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ३ लाख टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स या कालावधीत २८ पैशांनी वाढून ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२१८.९५ रुपये आहे.

    • Multibagger stocks : या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ३ लाख टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स या कालावधीत २८ पैशांनी वाढून ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२१८.९५ रुपये आहे.

Multibagger stocks : कूलर बनवणारी कंपनी सिम्फनी लिमिटेडच्या शेअर्सनी मल्टिबॅगर रिटर्न्स दिले आहेत. सिम्फनीच्या शेअर्सनी ३ लाखांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स या कालावधीत २८ पैशांनी वाढून ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यातील उच्चांक १२१८.९५ रुपये आहे. तर निचांकी पातळी ८२१ रुपये आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

१ लाखांचे केले ३० कोटी रुपये

सिम्फनीचे शेअर्स बीएसईवर ६ जून २०२३ ला २८ पैसेच्या पातळीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्सनी २६ मे २०२३ ला बीएसईवर ८४७.२५ रुपयांवर बंद झाले. सिम्फनीच्या शेअर्सनी या कालावधीत गुंतवणूकदारांचे ३०२००० टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ६ जून २००३ ला सिम्फनीच्या शेअर्समध्ये १ लाख गुंतवणूक केली असेल तर सध्याच्या स्थितीत हे पैसे अंदाजे ३०.२५ कोटी रुपये होतील.

१५ वर्षात २२००० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा

सिम्फनीच्या शेअर्सनी १५ वर्षात गुंतवणूकदारांना २२१९७ टक्के परतावा दिला आहे. सिम्फनीचे शेअर्स ११ जूलै २००८ ला ३.८० रुपयांच्या पातळीवर होते. मल्टिबॅगर कंपनीचे शेअर्स २६ मे २०२३ ला बीएसईवर ८४७.२५ रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने ११ जुलै २००८ ला सिम्फनीच्या शेअर्समध्ये १ लाखांची गुंतवणूक केली असेल तर सध्या्च्या स्थितीत हे मूल्य अंदाजे २.२३ कोटी रुपये आहे.

विभाग

पुढील बातम्या