मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमती ७६ डाॅलर्स पार, देशांतर्गत बाजारपेठेत विविध शहरात असे आहे

Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमती ७६ डाॅलर्स पार, देशांतर्गत बाजारपेठेत विविध शहरात असे आहे

May 10, 2023, 08:58 AM IST

    • Petrol Diesel price today 10 May 2023 : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ चढउतार पाहायला मिळत आहेत. देशांतर्गत पातळीवर मात्र विविध शहरांतील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
petrol diesel price HT

Petrol Diesel price today 10 May 2023 : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ चढउतार पाहायला मिळत आहेत. देशांतर्गत पातळीवर मात्र विविध शहरांतील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

    • Petrol Diesel price today 10 May 2023 : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ चढउतार पाहायला मिळत आहेत. देशांतर्गत पातळीवर मात्र विविध शहरांतील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel price today 10 May 2023 : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ चढउतार पाहायला मिळत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइल ७६.१३ डाॅलरवर आहे. मात्र, आज म्हणजेच १० मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र देशातील १६ राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

Flipkart Sale: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा; स्मार्टफोन, टीव्हीसह 'या' वस्तूंवर मिळणार तगडं डिस्काऊंट

Bank Holiday may 2024 : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी

१६ राज्यांमध्ये पेट्रोल १००रुपयांच्या वर

देशातील १६ राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर विकले जात आहे. तर ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही डिझेल १०० रुपयांच्या वर आहे.

राजस्थानमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोल

भारतातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकले जात आहे. येथे एक लिटर पेट्रोलचा दर ११३.३० रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९८.०७ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल १०९.२६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९५.६६ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

देशातील विविध शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग